T20 World Cup मध्ये भारताच्या पराभानंतर पंजाब येथे कश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ला, मारहाण-तोडफोड केल्याचा आरोप
Representative Image (Photo Credits: File Photo)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना नुकताच पार पडला. त्यावेळी पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला गेला. याच पार्श्वभुमीवर रविवारी रात्री पंजाब मधील दोन कॉलेजमध्ये कश्मीरी विद्यार्थ्यांवर कथित रुपात हल्ला करण्यात आला आहे. कश्मीरी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात पोस्ट केले आहे. परंतु या व्हिडिओची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. पंजाब मधील संगरुर जिल्ह्यात भाई गुरुदास इंस्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सामन्यानंतर आपल्या हॉस्टेलच्या आतमधील हल्ल्याचे व्हिडिओ शेअर केले. असाच प्रकार पंजाब मधील खरडच्या रयात बाहरा युनिव्हर्सिटी येथे सुद्धा घडली आहे.

जम्मू-कश्मीर स्टुडेंट्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता नासिर खुहेमी यांनी या घटनेबद्दल बोलताना म्हटले की, पंजाबच्या संगरुर आणि खरड मध्ये कश्मीरी विद्यार्थी आपल्या रुममध्ये मॅच पाहत होते. जसा भारताचा पराभव झाला तेव्हा तेथे काही विद्यार्थी आले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान स्थानिक लोक आणि अन्य विद्यार्थ्यांनी त्यांचा त्यांच्यापासून दूर करत बचाव केला.(Bihar Rape Case: बिहारमध्ये शिकवणी वरून परतत असणाऱ्या 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार, गावकऱ्यांनी आरोपीला पोलिसांच्या हाती केले स्वाधिन)

Tweet:

इंडियन एक्सप्रेसच्या मते, संगरुर कॉलेजच्या एका व्हिडिओ मध्ये पीडि विद्यार्थ्याने म्हटले की, सुरक्षा गार्डने युपीच्या काही विद्यार्थ्यांना आतमध्ये येण्याची परवानगी दिली. त्यानंतर ते आतमध्ये येत त्यांनी मारहाण आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. पंजाब पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचून तेथील स्थिती शांत केली. पोलीस अधिकाऱ्यांनी या बद्दल कश्मीरी विद्यार्थ्यांसोबत ही बातचीत केली.