Swine Flu (Photo Credits: PTI)

चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) ने हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहे अशा रोज काही ना काही बातम्या कानावर येत आहे. त्यातच दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिल्लीत सुप्रीम कोर्टातील 6 न्यायाधीशांना स्वाईन फ्लू (Swine Flu) झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. काश्मीर, बंगळूरु पाठोपाठ आता स्वाईन फ्लू च्या तडाख्यात सुप्रीम कोर्ट देखील अडकल्याचे यावरून कळतेय. या 6 जणांमुळे उपाययोजना म्हणून येथील अन्य न्यायाधीशांचे लवकरच लसीकरण होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टातील 6 न्यायाधीशांना स्वाईन फ्लू झाला असल्याची माहिती न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांची भेट घेतली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे (SA Bobde) यांच्याशी चर्चा केली आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. सरन्यायाधीशांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (एससीबीए)च्या अध्यशांशी बैठक होणार आहे. स्वाईन फ्लू रोखण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या!

तोपर्यंत सुप्रीम कोर्टातील कर्मचा-यांनी आणि न्यायाधीशांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सरन्यायाधीशांकडून करण्यात आले आहे. तसेच शक्यतो मास्क घालून काम करावे असेही सांगण्यात येत आहे. येथील न्यायाधीशांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.

तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणं, शिंका येणं, घशामध्ये खवखव, थकवा ही स्वाइन फ्लूची लक्षणं आहेत. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास सर्वसामान्य म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका अशा सूचना सुप्रीम कोर्टात देण्यात आल्या आहेत.