Surat ONGC Plant Massive Fire: सुरत च्या ONGC प्लांट मध्ये मोठा स्फोट होउन लागली भीषण आग, Watch Video
Surat ONGC Plant Massive Fire (Photo Credits: ANI)

सुरत (Surat) च्या हजीरा (Hazira Plant) भागातील ऑईल अ‍ॅंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) प्लॅंट मध्ये आज पहाटे भीषण आग लागल्याचे समजत आहे. ही आग इतकी मोठी होती की दुर दुर पर्यंत याच्या झळा दिसुन येत होत्या, या माहितीनंंतर अग्निशमन दलाच्या 12 गाड्या पोहचलेल्या होत्या, मात्र आगीचे स्वरुप इतके विक्राळ आहे की या कामात बर्‍याच अडचणी येत होत्या. प्राप्त माहितीनुसार, आज पहाटे 3 वाजुन 3 मिनिटांंनी या प्लांट च्या आतुन मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला, आणि त्याच्यापाठोपाठच दोन अन्य स्फोट सुद्धा झाले या आवाजाने आजुबाजुच्या भागातील नागरिकांंमध्ये बराच गोंंधळ झाला आणि या स्फोटांनंतर मोठ्या आगीच्या ज्वाला अगदी दूरवरुनही दिसत होत्या.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

या आगीच्या संदर्भात सुरतचे कलेक्टर डॉ. धवल पटेल यांंनी सांंगितले की, आज सकाळी लागलेली आग ही नेमकी कशाच्या स्फोटामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या प्रकरणी तपास सुरु आहे.सध्या आग नियंंत्रणात आणली गेली असुन कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

सुरत ONGC प्लांट आगीचा व्हिडिओ

ANI ट्विट

दरम्यान, यापुर्वी सुद्धा सुरत च्या याच ओएनजीसी प्लांट मध्ये 2015 साली सुद्धा आग लागल्याची घटना घडली होती ज्यामध्ये 13 जण गंभीर जखमी झाले होते.यावेळीही आगीच्या भीषण ज्वाळा आणि धुर अगदी 10 किमी च्या अंतरापर्यंत दिसुन येत होता.