Supreme Court | (Photo Credit: Twitter/ ANI)

National Task Force: देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्यांच्या मुद्द्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स (National Task Force) स्थापन केला आहे. हा टास्क फोर्स शैक्षणिक संस्था IIM, AIIMS, IIT, NIT आणि इतर विद्यापीठांमध्ये जातीय छळाच्या आरोपांची चौकशी करेल. 2023 मध्ये दिल्ली आयआयटीच्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

एससी/एसटी समुदायातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू -

2023 मध्ये आयआयटी-दिल्लीमध्ये एससी/एसटी समुदायातील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. गेल्या सुनावणीदरम्यान, अनुसूचित जाती प्रवर्गातील दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. या विद्यार्थ्यांचा मृत्यू आयआयटी दिल्लीमध्ये झाला. (हेही वाचा - Student Dies by Suicide: फी जमा न केल्याने मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्र दिलं नाही; उत्तर प्रदेशातील 12 च्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवलं जीवन)

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती याचिका -

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या याचिकेत एफआयआर नोंदवण्याची आणि केंद्रीय एजन्सीकडून मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही याचिका 2024 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. दोन्ही याचिकाकर्त्यांचे मुले आयआयटी दिल्लीमध्ये बी.टेकचे विद्यार्थी होते. (हेही वाचा - JEE Fail Student Dies By Suicide: 'आई-बाबा, मला माफ करा' जेईई परीक्षेत अपयश, इयत्ता आकरावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या)

आयआयटी दिल्ली कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू -

तथापि, 2023 मध्ये आयआयटी दिल्ली कॅम्पसमध्ये या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याचिकाकर्त्यांनी आरोप केला की, दोन्ही विद्यार्थी अनुसूचित जाती समुदायाचे होते आणि त्यामुळे त्यांना भेदभावाचा सामना करावा लागत होता. याचिकेत अशीही भीती व्यक्त करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली होती.