Vande Bharat Trains (फोटो सौजन्य - PTI)

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी (Uttar Pradesh’s Barabanki) येथे रविवारी वंदे भारत एक्सप्रेसवर (Vande Bharat Express) दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ऑनलाईन उपस्थितीत रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम सुरू असतानाच बाराबंकीमधील सफेदाबाद रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेक झालेली वंदे भारत ट्रेन सकाळी 10.40 वाजता लखनौला पोहचली. (हेही वाचा - Mahesh Baghel: मृत्यूनंतर अर्ध्या तासाने भाजप नेते महेश बघेल झाले जिवंत, डॉक्टरांनी केले होते मृत घोषित)

घटनेची माहिती मिळताच बाराबंकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. RPF या घटनेची माहिती मिळताच निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत अज्ञात व्यक्ती तेथून फरार झाले होते. गेल्या महिन्यात देखील वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने अज्ञातांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.  सरकारी मालमत्तेचे नुकसान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे अशा कलमांखाली अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.