
भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market ) गुरुवारी (14 मार्च) अनिश्चिततेने उघडला, सेन्सेक्स (Sensex) 70.75 अंकांनी वाढून 74,100.51 वर उघडला, तर निफ्टी (Nifty) 2 अंकांनी घसरून 22,468.50 पासून सुरू झाला. जागतिक आर्थिक ट्रेंड आणि देशांतर्गत निर्देशांकांचे मूल्यांकन करताना गुंतवणूकदार सावध राहिले. ज्यामुळे बाजारातील भावना संमिश्र राहिल्या. आज बाजार सुरु झाला तेव्हा गुंतवणुकदारांना विशेष निर्णय घेताना संभ्रमाच्या स्थितीचा सामना करावा लागला. गुंतवावेत की विक्रीस भर द्यावा याचा निर्णय घेताना गुंतवणूकदार द्विधा मनस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले. ज्याचा परिणाम संमिश्र स्वरुपाचा राहिला. जाणून घ्या बाजारात आज वधाराने सुरुवात (NSE and BSE Opening Gainers) करणारे समभाग. सोबतच लाल रंगांनी सुरवात करणारे टॉप समभागही जाणून घ्या.
स्टॉक मार्केटमधील आजचे वधारलेले आणि तोट्यात असलेले समभाग
सुरुवातीच्या वेळी बाजारातील कामगिरी संमिश्र होती. मात्र, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स हळूहळू वधारताना दिसला तर नॅशनल स्टॉक एस्चेंजचा निफ्टी 50 घसरताना दिसला. बाजार सुरु होताच सर्वाधिक नफा कमावनारे शेअर्स खालील प्रमाणे:
सर्वाधिक नफा मिळवणारे समभाग:
- ओएनजीसी (ONGC)
बीईएल (BEL)
टाटा स्टील (Tata Steel)
इंडसइंड बँक (IndusInd Bank)
पॉवर ग्रिड
सर्वाधिक तोटा सहन करणारे समभाग:
- श्रीराम फायनान्स
- M&M
- बजाज ऑटो
- आयशर मोटर्स
- अदानी पोर्ट्स
बाजारभाव आणि तज्ञांचे मत
बाजार विश्लेषकांनी आजच्या सत्रावर परिणाम करणारे प्रमुख घटक अधोरेखित केले:
शेअर बाजाराचे अभ्यासक आणि बाजार तज्ज्ञ अजय बग्गा यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, अमेरिकेचा CPI डेटा अपेक्षेपेक्षा कमी आला, ज्यामुळे अमेरिकन शेअर बाजारात थोडीशी वाढ झाली, जी या आठवड्यात आधीच 3% घसरली होती. ट्रम्पचे टॅरिफ आणि कॅनडा, चीन आणि EU कडून प्रतिशोधात्मक कृतींसह चालू जागतिक व्यापार तणाव अनिश्चितता निर्माण करत आहेत. देशांतर्गत आघाडीवर, अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे भारताचा CPI चलनवाढ कमी झाली आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आहे.
यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगिले की, निफ्टी त्याच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरला परंतु मागील सत्रात सकारात्मक क्षेत्रात बंद होऊ शकला नाही. सपोर्ट झोन 22,245 - 22,330 दरम्यान आहे, तर प्रमुख प्रतिकार पातळी 22,677 आणि 22,798 वर आहेत.
दरम्यान, बाजार दिवसभरात जसजसा पुढे जाईल तसतसे गुंतवणूकदार जागतिक बाजारातील ट्रेंड, देशांतर्गत आर्थिक निर्देशक आणि संस्थात्मक गुंतवणूकींवर बारकाईने लक्ष ठेवतील. दीर्घ वीकेंड जवळ येत असल्याने, तज्ञांचे असे मत आहे की दिवसाच्या उत्तरार्धात काही नफा बुकिंग दिसून येईल.