Stock Market | Representational Image (Photo Credits: Pixabay)

शेअर बाजारात (Share Market) आज मोठा भूकंप पहायला मिळाला. आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1200 अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही (Niffty) पडझड पाहायला मिळत आहे. दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजाराने लाल रंगात व्यवहार करण्यास सुरुवात केली आणि बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच बीएसई (BSE) सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरून 72,200 अंकावर आला तर निफ्टीही 200 हून अधिक अंक घसरणीसह खुला झाला. सध्या सेन्सेक्सचा निर्देशांक 1200 च्या घसरणीनंतर 71 हजारावर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 380 च्या घसरणीनंतर 21,650 अंकावर व्यवहार करत आहे. (हेही वाचा - Sensex Record High: सेन्सेक्सने ओलांडला 72,600 चा स्तर, सार्वकालिक उच्चांकावर, Nifty देखील वाढला)

बुधवारी बाजारात निराशा दिसून आली आणि HDFC चे शेअर्स १०९ रुपयांनी घरून 1,570 रुपयांवर उघडले. मंगळवारी संध्याकाळी बाजार बंद झाल्यानंतर HDFC बँकेने निकाल जाहीर केला. ज्याचे पडसाद बुधवारी सकाळी दिसून आले. बीएसई सेन्सेक्सवर बहुतांश बँकांचे शेअर्स कोसळले. यापैकी येस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय, ॲक्सिस आणि कोटक या शेअर्सना तोटा सहन करावा लागला.

याशिवाय इंडिया एनर्जी एक्स्चेंज, बंधन एस अँड पी, लोढा डेव्हलपर्स आणि ग्रॅविटा इंडियाचे शेअर्सही सुरुवातीच्या व्यवहारात लक्षणीय आपटले. तसेच निफ्टीवर एचडीएफसी बँक, हिंदाल्को, टाटा स्टील, बजाज ऑटो आणि डॉ रेड्डीज लॅबच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली.