स्पाईसजेटचा (SpiceJet) चार दिवसांसाठी मेगासेल सुरु झाला आहे. या सेल अंतर्गत तुम्ही विमानप्रवास केवळ 899 रुपयात करु शकता. या सेलमध्ये देशांतर्गत प्रवासासाठी तुम्हाला 899 रुपये मोजावे लागतील. तर आंतरराष्ट्रीय प्रवास खर्च 3699 रुपयांपासून सुरु होत आहे. या सेलअंतर्गत प्रवाशांना देशांतर्गत प्रवास करण्यासाठी किलोमीटरमागे 1.75 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 2.5 रुपये प्रति किलोमीटर द्यावे लागतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. (विमानप्रवासात आरोग्याच्या या '5' समस्यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !)
देशांतर्गत विमानप्रवास 899 रुपयांपासून सुरु होत असून या टॅक्सचा देखील समावेश आहे. त्याचप्रमाणे टॅक्ससहीत आंतरराष्ट्रीय प्रवास खर्च 3699 रुपयांपासून सुरु होत आहे. 5-9 फेब्रुवारी दरम्यान हा सेल सुरु राहील. यात तुम्ही 25 सप्टेंबर 2019 पर्यंतचे तिकीट बुकींग करु शकता.
SBI च्या क्रेडिट कार्डवरुन तिकीट बुक केल्यास 10% डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय प्रॉयरिटी चेक-इन देखील मोफत करता येईल. यासाठी प्रोमोकोड आहे 'SBISALE.' 'ADDON25' या प्रोमोकोडचा वापर केल्यास मनपसंत सीट मिळेल तसंच जेवणावर 25% वेगळी सूट देण्यात येईल. तिकीट बुकींग स्पाईस जेट मोबाईल अॅपवरुन केल्यास 5% अधिक सूट मिळेल. यासाठी 'ADDON30' या प्रोमोकोडचा वापर करा.
899 रुपयांत कुठे कुठे प्रवास करता येईल?
- जम्मू-श्रीनगर
- चेन्नई-बंगळुरु
- कोची-बंगळुरू
- हुबळी-बंगळुरू
इतर तिकीट दर
# दिल्ली-कोयंबटूर- 2899 रुपये
# मुंबई-कोची- 1849 रुपये
# दिल्ली-गुवाहाटी- 2499 रुपये
# बंगळुरू-दिल्ली- 2649 रुपये
# अहमदाबाद-बंगळुरु- 1749 रुपये
# अहमदाबाद-चेन्नई- 2299 रुपये
# चेन्नई-कोलकाता- 2349 रुपये
# दिल्ली-चेन्नई- 2799 रुपये
डिस्काऊंटचा फायदा कनेक्टिंग फ्लाईट्ससाठी मिळणार नाही. थेट प्रवास असेल तर तुम्हाला या डिस्काऊंट अवश्य लाभ घेता येईल.