मनी लॉंडरिंगच्या आरोपाखाली (Money Laundering Case) सध्या ईडीच्या (ED) ताब्यात असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पीएमपीएल कोर्टाने ईडी कडून सादर करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे. यामध्ये गोवावाला कम्पाऊंड कुर्ला येथील आर्थिक व्यवहारांमध्ये डी गॅंग सोबत मलिकांचे संबंध असल्याचं पुराव्यावरून स्पष्ट होत असल्याचं निरिक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. कोर्टाने याप्रकरणात 1993 च्या ब्लास्टमधील आरोप सहावली खान विरोधात पुढील कारवाईला देखील परवानगी दिली आहे.
पीएमपीएल कोर्टाने आरोपी नवाब मलिकांना डी गॅंगच्या हसिना पारकर, सलिम पटेल, सरदार खान यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचून मुनिरा प्लंबर नावाने संपत्ती बळकावल्याचं सांगितलं आहे. मलिकांनी दाऊदची बहिण हसिना पारकर व तिच्या सहकार्यांच्या मदतीने जमीन बळकावल्याने त्यांच्याविरोधात मनी लाँण्ड्रींगविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करता येईल असे कोर्टाने म्हटलं आहे. यामधील त्यांचे उत्पन्न बेकायदेशीर कृत्यांमधून कमावलेले असल्याचंही म्हटलं आहे. ED on Nawab Malik's Bail Plea: 'नवाब मलिक यांची जामीन याचिका म्हणजे कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न'; ईडीचे न्यायालयात उत्तर.
Special PMLA court took cognisance of ED's chargesheet against Maharashtra Min Nawab Malik& said there is prima facie evidence to indicate that he was directly &knowingly involved in money laundering & criminal conspiracy with others to usurp Goawala compound in Kurla
(File Pic) pic.twitter.com/wbguvEedu6
— ANI (@ANI) May 21, 2022
हसीना पारकरने सलीम पटेलला सोबत घेऊन कुर्ल्याच्या गोवावाला कंपाऊंडाच वाद मिटवला होता. त्यानंतर सारी मालमत्ता नवाब मलिकांना विकण्यात आली होती, असे आरोपपत्रात म्हटलं आहे.
सध्या नवाब मलिक प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुरूंगातून बाहेर पडले आहेत. त्यांच्यावर क्रिटी केअर खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला नाही पण खाजगी रूग्णालयामध्ये उपचारांसाठी परवानगी देण्यात आली आहे.