Sonia Gandhi To File Nomination For Rajya Sabha: सोनिया गांधी राज्यसभेसाठी राजस्थान येथून आज भरणार निवडणूक अर्ज
Sonia Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2024) लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेसाठी त्या राजस्थानमधून उमेदवारी अर्ज आजच (14 फेब्रुवारी) दाखल (Sonia Gandhi To File Nomination For Rajya Sabha) करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या दिल्ली येथील निवासस्थानाहून राजस्थानला निघाल्या आहेत. पाठिमागील अनेक वर्षे रायबरेली येथून लोकसभा या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व करणाऱ्या सोनिया गांधी (77) प्रथमच वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभा सदस्यत्वासाठी मैदानात उतरत आहेत. प्रकृती आणि वाढते वय पाहता त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे सोनिया गांधी यांनी सन 2019 मध्येच जाहीर केले होते. त्यामुळे राजकीयवर्तुळात चर्चा आहे की, त्यांच्या जागी रायबरेली येथून प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उमेदवारी दाखल करतील.

रायबरेली येथून पाच वेळा लोकसभेवर प्रतिनिधित्व

काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सोनिया गांधी उमेदवारी अर्ज दाखल करतील तेव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे देखील उपस्थित असतील. त्या जयपूर येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान, राजस्थानमधील जागेसाठी पक्षाने अद्याप तरी अधिकृतरित्या उमेदवार जाहीर केला नाही. पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यापुढे त्यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत. रायबरेली येथून त्या पाच वेळा निवडणूक जिंकून लोकसभेत आल्या आहेत. सन 1999 मध्ये पहिल्यांदा त्या रायबरेली येथून विजयी झाल्या आणि पुढे त्यांनी त्यात सातत्य ठेवले. (हेही वाचा, Sonia Gandhi On Political Retirement: मी कधीही निवृत्त झाले नाही आणि कधी होणारही नाही; राजकारणातील निवृत्तीच्या बातम्यांदरम्यान सोनिया गांधींचे महत्त्वपूर्ण विधान)

व्हिडिओ

राज्यसभेसाठी 15 राज्यांतून 56 खासदार निवृत्त

राज्यसभा निवडणूक 2024 मध्ये 15 राज्यांतून वरिष्ठ सभागृहाच्या एकूण 56 खासदार निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. निवडणूक अर्ज दाखलकरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी असणार आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: कॉंग्रेस नेत्या Priyanka Gandhi महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता; जाणून घ्या सुप्रिया सुळे व यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया (Video))

राजस्थान राज्यातील पक्षीय बलाबल आणि मतांची संख्या पाहता काँग्रेस एकूण तीन जागांपैकी एक उमेदवार आरामात निवडूण आणू शकतो. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह राज्यसभेवीरील सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने निवृत्त होत आहेत. त्यामुळे राजस्थानातून एक जागा रिक्त होत आहे. त्याच जागी सोनिया गांधी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. सोनिया गांधी या गांधी कुटुंबातून राज्यसभेवर जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्ती असतील. या कुटुंबातून इंदिरा गांधी ऑगस्ट 1964 ते फेब्रुवारी 1967 या कालावधीसाठी राज्यसभा सदस्य राहिल्या आहेत.