देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता भारतीय रेल्वे बोर्डातील काही अधिकाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे रेल्वे भवनातील सर्व ऑफिसे 26-27 मे दिवशी निर्जंतुकीकरणासाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत रेल्वे भवनातील चौथा मजला येत्या 29 मे पर्यंत बंद राहील असे ही सांगण्यात आले आहे.
कोरोना व्हायरचे देशावरील महासंकट दूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोरोना व्हायरसवर अद्याप कोणते ही औषध उपलब्ध नसल्याने त्यासंबंधित लसीचा शोध वैज्ञानिकांकडून घेतला जात आहे. सरकार स्थलांतरित कामगारांना सुद्धा आपल्या घरी परत जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनच्या सहाय्याने त्यांची मदत करत आहेत. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा वारंवार नागरिकांना कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.(Coronavirus: कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती 11 दिवसांनतर दुसऱ्यांना संसर्ग देऊ शकत नाही; NCID च्या शास्त्रज्ञांचा दावा)
Some officials of Railway Board have recently tested #COVID19 positive. It's been decided to close all Offices of Rail Bhawan on May 26 & 27 for intensive sanitization. Offices at 4th floor of Rail Bhawan to remain close till May 29 for thorough disinfection: Ministry of Railways pic.twitter.com/maxVy7wddO
— ANI (@ANI) May 25, 2020
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा 138845 वर पोहचला आहे. तसेच 77103 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 4021 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतासह महाराष्ट्राला सु्द्धा कोरोनाचा सर्वाधितक फटका बसला असून आकडा 50 हजारांच्या पार गेला आहे.