Saryu River solar boat । Twitter PTI

अयोद्धेच्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) निर्माणानंतर या शहराचा चेहरा मोहराच बदलला जाणार आहे. यामधलं एक पाऊल म्हणजे शरयू नदी (Saryu River) मध्ये चालवली जाणारी देशातील पहिली सौर उर्जेवर चालवली जाणारी बोट. ही ई बोट ( E Boat) शरयू नदी मध्ये चालवली जाणार आहे. नुकतीच योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांच्या सरकारकडून त्याची घोषणा करण्यात आली आहे.

Uttar Pradesh New and Renewable Energy Agency कडून ही सोलर बोट चालवली जाणार आहे. शरयू घाटावरच या बोटीचं असेम्ब्लिंग झाले आहे. यासाठी देशाच्या विविध भागातून त्याचे पार्ट्स बनवून घेण्यात आले आहेत. सध्या एक बोट तयार असून त्याची टेस्टींग सुरू आहे. 22 जानेवारीला मंदिराचे लोकार्पण आणि राम जन्मभूमीच्या मंदिरात रामलल्लांची मूर्ती स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते तिचे उद्द्घाटन होणार आहे. त्यानंतर भाविकांना ही नियमित उपलब्ध करून दिली जाईल. Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धा राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या विधिंना आजपासून सुरूवात होताच भाविकांनी दिवे लावत शरयूच्या घाटावर केली आरती ( Watch Video) .

सौर उर्जेवर चालणारी ही बोट ड्युअल-मोड ऑपरेटिंग बोट आहे. जी 100 टक्के सौर उर्जेवर चालते. सौर चार्जिंग व्यतिरिक्त, ते विद्युत उर्जेचा वापर करून देखील ऑपरेट केले जाऊ शकते. विशेष म्हणजे, ही बोट catamaran category शी संबंधित आहे, जिथे दोन हुल स्ट्रक्चर्स जोडून एका बोटीची रचना तयार केली जाऊ शकते.

बोटीमध्ये 30 प्रवासी बसू शकतील अशा क्षमतेसह, ती Naya ghat मधून चालवली जाईल. बोटीचा प्रवास सुमारे एक तास ते 45 मिनिटांचा असतो, ज्यामुळे प्रवाशांना नदीकाठावरील ऐतिहासिक मंदिरे आणि वारसा स्थळांना न्याहाळता येईल. पूर्ण चार्जिंग नंतर ती 5-6 तास प्रवास करू शकेल.