Budget 2019: अर्थसंकल्प 2019 सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून सोशल मीडियावर खिल्ली
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

Budget 2019: अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांच्या अनुपस्थित अर्थमंत्रालाचा अतिरिक्त पदभार पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तर शुक्रवारी (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आणि आशा होत्या. तर प्रत्येक गोष्टीचा विचार करुन सरकारने तरतूदी केल्या आहेत. त्याचसोबत शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देत प्रतिवर्ष 6000 रुपये बँक खात्यात जमा होणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

तर मध्यमवर्गीयांसाठी अतंरिम अर्थसंकल्प कर लागू होणाऱ्या व्यक्तींसाठी पाच लाख रुपये आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कराबाबत सूट दिली आहे. सरकारने असंगठित कामगार वर्गाला ही नवीन पेंन्शन योजना जाहीर केली आहे. (हेही वाचा-Budget 2019: 59 मिनिटांत 1 करोड रुपये कर्ज मिळणार, लघु उद्योगधंद्यातील व्यापाऱ्यांसाठी खास तरतूद)

त्याचसोबत प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची घोषणा करत असंगठित क्षेत्राला 15,000 रुपये मासिक कर प्राप्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 3,000 रुपये प्रति महिना पेंन्शन देण्यात येणार आहे.

मोदी सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पाची सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. काही लोक अर्थसंकल्पामुळे खुश आहेत. तर काही जण मोदी सरकारच्या अर्थसंकल्पामुळे नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे.