प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या वाहनाला अपघात, थोडक्यात बचावले
anand shinde (Photo :Wikimedia Commons)

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे ( Anand Shinde) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील पुणे- सोलापूर महामार्ग (Pune-solapur Highway) येथे घडली. या अपघातात आनंद शिंदे यांना गंभीर दुखापत झाली आहे. जवळच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. वाहनाला अपघात झाला त्यावेळी आनंद शिंदे यांच्यासह अन्य चौघे प्रवास करत होती. सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाली नाही

आनंद शिंदे यांनी अनेक चित्रपटात गायन केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी चित्रपटातही त्यांनी आवाज दिला आहे. आनंद शिंदे मंगळवारी रात्री चौघासह मुंबईहून सांगोलाकडे निघाले होते. या दरम्यान रात्री २ वाजता पुणे- सोलापूर महामार्गावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्राथमिक उपचार चालू आहेत. हा अपघात कशामुळे झाला आहे? अद्याप याची माहिती मिळाली नाही. परंतु आनंद शिंदे यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. हे देखील वाचा-नोएडा येथील स्पाईस मॉलला भीषण आग

वडिल प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला गायनाचा वारसा गायक आनंद शिंदे पुढे चालवत आहेत. आनंद शिंदे यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच गाणी गात सर्वांची मन जिंकली आहेत. आनंद शिंदे यांची अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत.