स्वतंत्र भारतात मतदानाचा (First Voter of Independent India) अधिकार बजावणारा पहिला मतदार श्याम सरन नेगी (Shyam Saran Negi) यांचे शनिवारी (5 नोव्हेंबर) निधन झाले. ते 106 वर्षांचे होते. हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) किन्नौर (Kinnaur) येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे. "स्वतंत्र भारताचे पहिले मतदार आणि किन्नौरचे असलेले श्याम सरन नेगी जी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले," त्यांनी हिंदीत लिहिले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, श्याम सरन नेगी यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टल बॅलेटद्वारे अलिकडेच त्यांच्या आयुष्यातील शेवटचे मतदान केले होते. त्याबद्दल किन्नरच्या उपायुक्तांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कारही केला. EC ने नेगी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांना "लोकशाहीवर असाधारण विश्वास असलेला माणूस" म्हटले. (हेही वाचा, New Parliament Building Foundation: लोकशाही ही भारताची संस्कृती- पंतप्रधान मोदी)
पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले की, भारतीय निवडणूक आयोगाने श्याम सरन नेगी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या सेवेबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत. त्यांनी लाखो लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले, त्यांच्या निधनापूर्वीच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 2 नोव्हेंबर 2022 रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले,”असे निवडणूक आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजप, काँग्रेस आणि अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नेगी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.