विकृतीचा कळस! वडिलांनी आपल्या 4 वर्षांच्या मुलासोबत ठेवले 'अनैसर्गिक संबंध', नंतर गळा दाबून केली हत्या- Report
Representational Image (Photo Credits: Facebook)

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिलासपूर जिल्ह्यात वडिलांनी आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत या पित्याने आधी आपल्या निष्पाप मुलासोबत अनैसर्गिक कृत्य (Unnatural Sex) केले, नंतर त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर मुलगा बेपत्ता झाल्याची खोटी कथाही रचली. घटनेनंतर रात्री उशिरा त्याने मृतदेह घराच्या गल्लीमध्ये फेकून दिला. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अनेक हिंदी माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. शुक्रवारी सायंकाळी खेळत असताना हा मुलगा गायब झाला होता. त्यानंतर त्याची काहीच माहिती नव्हती.

रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घराजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या शरीरावर ओरखड्याच्या खुणा होत्या, त्याचबरोबर गळ्यावर दोरीच्या खुणाही आढळून आल्या. यासोबतच मुलाच्या गुदद्वारात रक्ताचे डाग आढळून आले. यावरून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात पती-पत्नीच्या वादातून या निष्पाप मुलाची हत्या झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये वडिलांनीच मुलासाबोत अनैसर्गिक कृत्य करून त्याची हत्या केल्याचे सत्य समोर आले. मुलाच्या आईने पोलिसांना सांगितले की, तिचा पती म्हणजेच मुलाचा वडील मदनसिंग तिच्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. तिने यासाठी नकार दिल्यास तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. शुक्रवारीही याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण झाले व ती माहेरी निघून गेली. (हेही वाचा: Jamshedpur Shocker: 4 वर्षांच्या मुलीने अभ्यासात रस न दाखवल्याने पालकांनी दिली मृत्यूची शिक्षा; मृतदेह झुडपात फेकून दिला)

त्यानंतर आरोपी वडील मदन दारूच्या नशेत सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान मुलाला घेऊन घरी आला आणि त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या दरम्यान मुलगा रडू लागला व त्याचवेळी मदनने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बेडखाली लपवून मुलाच्या बेपत्ता झाल्याची अफवा पसरवली. रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास त्याने मुलाचा मृतदेह घराबाहेर काढून रस्त्यावर फेकून दिला.