Mahrashtra Government Formation: महाराष्ट्र सत्ता संघर्षात आजचा दिवस अतिशय महत्वाचा ठरला, राज्यपाल कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी भाजपाला (BJP) सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले असताना भाजपने आपली भूमिका मांडत शिवसेना सोबत नसल्यास आपण सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर त्यानंतर आता शिवसेनेने (Shivsena) सुद्धा आपली सर्व शक्ती एकवटून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहे. राज्यपालांच्या सूचनेनुसार येत्या दिवसात जर का शिवसेना सुद्धा सत्ता स्थापनेचा दावा करण्यास फेल झाली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यावाचून पर्याय उरणार नाही. राजकीय अस्थिरतेच्या या एकूणच गोंधळामुळे सामान्य जनता देखील पुरती वैतागली आहे, अशातच #ShivsenaCheatsMaharashtra हा हॅशटॅग वापरत भाजपच्या समर्थकांनी ट्विटरवरून आपला संताप मांडायला सुरुवात केली आहे. अवघ्या काहीच तासात या हॅशटॅगचा वापर करत 31 हजाराहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.
ट्विटरवर ट्रेंड होणाऱ्या या हॅशटॅगनुसार, शिवसेनेने निवडणुकीपूर्वी महायुतीतून एकत्र लढण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार जनतेने मते दिली मात्र आता शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या अंतर्गत वादावर अडून राहत महायुतीला तोडू पाहत आहे. यामुळे जर का भाजपाने किंवा शिवसेनेने अन्य पक्षासोबत मिळून संयुक्तरित्या सरकार स्थापन केले तर ज्यांनी या युतीला निवडून दिले त्या जनादेशाचा अपमान होईल असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
पहा ट्विट
Uddhav Thackeray has become Dhritrastha of Mahabharat for his son throne he can do anything and go up to any level but he mee CM chair #ShivSenaCheatsMaharashtra
— wrongorright (@sachin06) November 10, 2019
I feel cheated, nothing to do with SS but forced to vote for SS because they were in alliance with BJP. What a waste.
— kpna1 (@kpna12) November 10, 2019
#ShivSenaCheatsMaharashtra its unbelievable that Uddhav will do alliance with NCP & Cong two parties who have arrested Balasaheb Thakery and sent him to jail called Hindus Terrorist abused VD.Savarkar & also declare Lord Ram as mythical creature SHAME on U SENA TRAITORS !!
— मराठा सरदार (@KshitijBokil) November 10, 2019
या सर्व प्रकरणात भाजपाने सरकारमधून पाय मागे घेतल्याने शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मिळून सरकार स्थापन करेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. याच चर्चांचा संदर्भ देत काहींनी तर बाळासाहेबांचे जुने व्हिडीओ सुद्धा शेअर केले आहेत. यामध्ये स्वतः बाळासाहेब सुद्धा काँग्रेसच्या विचारसरणीला विरोध करतायत पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्याच पक्षासोबत एकत्र येऊन सरकार मध्ये येऊ पाहत आहे असे आरोप लगावले जात आहेत.
पहा ट्विट
What Bal Thackeray said about an alliance with the NCP!!!#ShivSenaCheatsMaharashtra pic.twitter.com/6L1YQspAwr
— Chaitanya Chinchlikar (@filmy_foodie) November 10, 2019
दरम्यान, शिवसेना सरकारसाठी अन्य पक्षांशी हातमिळवणी करते का? कि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा एकदा निवडणूक सत्र घेण्याची वेळ येईल ? या प्रश्नांची उत्तरे सेनेची भूमिका समोर येताच सामन्यांपर्यंत येणार आहेत.