Baba Sivananda Dies | X

योगगुरू बाबा शिवानंद (Shivanand Baba) यांचे वयाच्या 128 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर वाराणसी मधील बीएचयू हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रात्री 8.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील 3 दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. बाबा शिवानंद यांच्या निधनाचं वृत्त त्यांच्या अनेक अनुयायींनी हॉस्पीटल बाहेर रांग लावली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. नक्की वाचा: International Yoga Day 2024: आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त मुंबईच्या कार्यक्रमात 127 वर्षीय पद्मश्री Shri Swami Sivananda यांनी सादर केली योगसाधना.  

कोण होते पद्मश्री बाबा शिवानंद?

बाबा शिवानंद यांना 2022 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 साली श्रीहट्ट जिल्ह्यामध्ये हरिपूर गावात झाला होता. हा भाग आता बांग्लादेश मध्ये आहे. त्यांच्या परिवारात आई-बाबा आणि बहिण यांचा समावेश होता. शिवानंद यांचे आईवडील भिक्षेकरू होते. घरात आर्थिक परिस्थिती अगदी बिकट असल्याने शिवानंद 4 वर्षांचे असताना त्यांना बाबा श्री ओंकारनंद गोस्वामी यांच्याकडे देण्यात आले होते. लहानपणापासूनच शिवानंद यांनी गुरूंकडे राहून शिक्षण घेण्यास सुरूवात केली. पुढे त्यांनी योगसाधना केली. शिष्यांनाही योगा शिकवला. आयुष्यभर ब्रम्हचर्य पाळले.

पंतप्रधान मोदींनी अर्पण केली श्रद्धांजली

21 मार्च 2022 साली राष्ट्रपती भवन च्या दरबार हॉल मध्ये शिवानंद बाबा यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता.

सध्या बाबा शिवानंद वाराणसी मध्ये भेलूपूर च्या दुर्गाकुंड भागामध्ये कबीर नगर मध्ये राहत होते. आता वाराणसीच्याच हरीश्चंद्र घाटावर त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत.