काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळही भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. हिमवर्षावात देखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष दुमदुमला. (हेही वाचा - Shiv Jayanti 2024: शिवजयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार)
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Jammu and Kashmir: A program was organized to celebrate the Shiv Jayanti at the Chhatrapati Shivaji Maharaj Statue in Kupwara, on the India-Pakistan Line of Control.
The soldiers paid their respect to Chhatrapati Shivaji Maharaj amidst snowfall and white ground all… pic.twitter.com/e4kZI6gA5b
— ANI (@ANI) February 19, 2024
भारत-पाक सीमेजवळ गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. कुपवाडा येथे उणे तापमानात हा अनोखा कार्यक्रम झाला. सभोवताली सर्वत्र बर्फ अशा कठीण परिस्थितीतही आपल्या जवानांनी महाराजांना जयंती दिनी केलेले अभिवादन पाहून अभिमान वाटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आम्ही पुणेकर संस्था, 41 राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते.