Share Market Update: शेअर बाजारात सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला तर निफ्टी 8,964 वर
Sensex | Photo Credits: File Photo

जगभरासह भारतावरही कोरोना व्हायरसचे संकट आहे. या संकट काळातही आज (9 एप्रिल) मुंबई शेअर बाजार काहीसा पॉझिटीव्ह नोटवर उघडला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 700 अंकांनी वधारून 30,614 वर पोहचला आहे. तर निफ्टी 8,964 वर पोहचला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात सेन्सेक्स मध्ये झालेली वाढ नक्कीच दिलासादायक आहे. दरम्यान एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 5% वाढ झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेनंतर अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याच अंशी चढाव दिसून आला. Dow Jones Industrial Average, S&P 500  या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3.4% बढत झाली. तर Nasdaq Composite rose या कंपनीचे शेअर्स 2.8% ने वाढले.

ANI Tweet:

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगासह भारतातही थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 5734 वर पोहचला आहे. गेल्या 24 तासांत त्यात 540 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतकंच नाही तर आतापर्यंत कोरोनाने देशात 166 लोकांचा बळी घेतला आहे.दरम्यान बरे झालेल्या 473 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.