लक्ष्यदीव्यचे नवनिर्वाचित प्रशासक प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी घेतलेल्या निर्णयांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिले आहे. या भल्यामोठ्या पत्राद्वारे पवार यांनी लक्ष्यद्वीपचे लोकसभा खासदार मोहम्मद फैजल यांनी उभ्या केलेल्या मुद्द्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. पटेल यांच्या निर्णयामुळे तेथील स्थानिक जनतेचे जीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने निर्माण केलेल्या लक्ष्यद्वीप मधील पॉलिसीज रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी पवार यांनी केली आहे. (कोरोना महामारी, शेती आदी मुद्द्यांवरुन शरद पवार यांचे केंद्र सरकारला पत्र)
पत्रात पवार लिहितात की, मोहम्मद फैजल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये दारुची नवी पॉलिसी अंमलात आणण्याचा विचार केला गेला असल्याचे म्हटले आहे. या केंद्रशासित प्रदेशांमध्ये कित्येक वर्षांपासून दारुची विक्री आणि दारुचे सेवन यासाठी सक्त मनाई आहे. परंतु, आता या नव्या दारु पॉलिसीमुळे या ड्राय प्रदेशात दारुचा प्रभाव वाढू शकतो. यासोबतच टुरिझमच्या नावाखाली पर्यटकांना देखील दारु आणण्यास परवानगी दिली गेली आहे.
शरद पवार ट्विट:
I would like to draw Hon'ble PM’s kind attention towards certain serious concerns raised by Shri P. P. Mohammed Faizal, MP (Lok Sabha), Lakshadweep, with regard to the policy decisions taken by the newly appointed Administrator of #Lakshadweep.@PMOIndia @narendramodi pic.twitter.com/fgCKvQMESL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 26, 2021
लक्ष्यद्वीपमध्ये देशातील सर्वात कमी क्राईम रेट असूनही अशा प्रदेशामध्ये अँटी सोशल अॅक्टीव्हीटी अॅक्टचे निर्बंध घालणे हे अत्यंत चिंताजनक आहे, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. तसंच लक्ष्यद्वीपमध्ये पर्यटन, क्रीडा, अंगणवाडी, मासेमारीची ठिकाणं यांसारखी मौल्यवान ठिकाणं तोडून तिथे खाजगीकरण केले जाणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे तेथील स्थानिकांना सरकारच्या टेंडरींग प्रोसेसमध्ये सहभाग घेणे कठीण होऊ शकते. परिणामी लक्ष्यद्वीपमधील बेरोजगारी वाढू शकते. शरद पवार यांनी या नव्या आदेशांविषयी पुर्नविचार करण्याचे आणि गरज नसलेले आदेश मागे घेण्याची विनंती पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे केली आहे.
प्रफुल्ल पटेल हे यापूर्वी गुजरातचे गृहमंत्री राहिले असून दादरा नगर हवेली आणि दिव दमण येथील माजी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर पटेल प्रकाशझोतात आले. याप्रकरणी पटेल यांना महाराष्ट्र पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी लक्ष्यद्वीपचे प्रशासक म्हणून सुत्रं हाती घेतली.