रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) चे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना पुढील तीन वर्षे पदावर राहण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीए सरकारने त्यांना मुदतवाढ दिली. शक्तिकांत दास हे कार्यकाळाची मुदतवाढ मिळवणारे पहिलेच आरबीआय गव्हर्नर (RBI Governor) ठरले आहेत. या आधीच्या सर्व गव्हर्नरनी मुदत संपताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि आपल्या पूर्वीच्या क्षेत्रात जाणे पसंत केले आहे .
सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीत म्हटले आहे की, मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मुदतवाढ दिली आहे. 10.12.2021 पासून पुढच्या तीन वर्षांसाठी पुढील आदेश निघेपर्यंत ते गव्हर्नर असतील. आरबीआय गव्हर्नर होण्यापूर्वी शक्तिकांत दास हे अर्थमंत्रालयात आर्थिक प्रकरणांचे सचिव होते. त्यांना 11 डिसेंबर 2018 मध्ये तीन वर्षांच्या कालावधीकरता आरबीआयचे प्रमुख (गव्हर्नर) बनविण्या आले होते. त्यांनी अर्थ, कर आणि उद्योग आदी विषयात महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. (हेही वाचा, RBI: कोरोना काळात नियमांपलिकडे जाऊन केलेले हे उपाय उपयुक्त ठरले- शक्तिकांत दास)
ट्विट
RBI Governor Shaktikanta Das gets three-year extension up to December 2024: Official order
— Press Trust of India (@PTI_News) October 29, 2021
शक्तिकांत दास यांनी जागतिक बँक, एशियाई विकास बँक (ADB), न्यू डेवलपमेंट बँक (NDB) आणि (ADB), न्यू डेवलपमेंट बँक (NDB) आदी ठिकाणी पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे.