Sex Racket: पीडिता कोर्टात म्हणाली 'मला आमदारांकडे पाठवलं जायचं' बिहार पोलिसांसमोर आव्हान, राजकीय वर्तुळात खळबळ
Sex Racket Bhojpur in Bihar | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

Sex Racket Bhojpur in Bihar: भोजपूर जिल्हा न्यायालयात सुरु झालेल्या एका सेक्स रॅकेट (Sex Racket) प्रकरण खटल्यात अल्पवयीन पीडितेने केलेल्या वक्तव्यामुळे बिहार (Bihar) राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. अल्पवयीन पीडितेने घडलेला प्रसंग आणि अन्यायाबाबत सांगताना म्हटले आहे की, या प्रकरणात आपल्याला एका आमदाराकडे पाठविले जात होते. पीडितेने सध्यातरी कोणाही आमदाराचे नाव घेतले नाही. पण, या निमित्ताने राज्यात चालणारी सेक्स रॅकेट आणि त्यात राजकीय वर्तुळातील व्यक्तींचा असलेला समावेश आणि लागेबांदे थेट पुढे येऊ पाहात आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बिहारमधील आरा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून भोजपूर पोलीसांनी पटना येथे चालणाऱ्या मोठ्या सेक्स रॅकेटचा खुलासा केला होता. सेक्स रॅकेटबाबत माहिती मिळताच पोलीस जोरदार कार्यरत झाले. या प्रकरणात काही संशयीत लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणाचे मास्टरमाइंड मात्र पोलिसांच्या हाती अद्याप लागले नाहीत. अटक करण्यात आलेल्या संशयीतांचा या प्रकरणात नेमकी काय आणि कोणती भूमिका होती याबबत माहिती मिळू शकली नाही.

पीडितेने म्हटले आहे की, भा.दं. स 164 अन्वये दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे की, या सेक्स रॅकेटमध्ये गुंतलेल्या मुलींना आरा येथील एका अभियंत्याच्या घरातून इतर हॉटेल्सवर नेले जात असे. पीडितेच्या या वक्तव्यनंतर बिहार पोलीस सतर्क झाले असून, 'तो' आमदार कोण याचा शोध घेत आहेत. पीडितेने निर्देशीत केलेला तो आमदार आणि या सेक्स रॅकेटचा मास्टरमाइंड अशा दोघांना अटक करण्याचे आव्हान आता बिहार पोलिसांसमोर आहे. (हेही वाचा, पुणे येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड, 4 तरुणींची सुटका)

दरम्यान, आराचे एसपी सुशील कुमार यांनी म्हटले आहे की, पीडितने न्यायालयात कोणत्याही आमदाराचे नाव घेतले नाही. पण, लवकरच आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू आणि त्याला अटक करु. अम्ही संपूर्ण प्रकरण समजून घेऊन त्याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहोत.