Bombay Stock Exchange (Photo Credits: PTI)

FY 2019-20: आज (1 एप्रिल) दिवशी सेंन्सेक्सने (Sensex) शेअर बाजारात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज पहिल्यांदा शेअर बाजारात सेन्सेक्सने 39,000  चा टप्पा पार केला आहे. सेन्सेक्समध्ये आज  300  अंकांहून अधिकची वाढ पहायला मिळाली आहे. आज 1 एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होते. डॉलरच्या तुलनेत रूपयादेखील मजबूत स्थितिमध्ये आहे. त्यामुळे ही उसळी पहायला मिळाली आहे. शेअर बाजाराच्या इतिहासात आज पहिल्यांदाच सेंसेक्सने 39,000 हजारांचा टप्पा पार केला आहे.

ANI ट्विट

सेन्सेक्ससोबतच आज निफ्टीदेखील तेजीत आहे. निफ्टी  आज 11,665.20 वर आहे. आज बाजार उघडताच निफ्टी  11,699.70 वर पोहचला होता.  मेटल, ऑटो, फायनॅन्शिअल स्टॉट्समध्ये चांगली कामगिरी झाल्याने आज पहिल्याच दिवशी शेअर बाजार चांदी दिसून आली आहे.