Sensex, Nifty मध्ये तेजी; मुंबई शेअर बाजार PM नरेंद्र मोदी यांच्या 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेज नंतर वधारला!
सेंसेक्स । फाईल फोटो

कोरोना व्हायरस संकटाने जगभरातील अनेक विकसित देशांचा अर्थव्यवस्थेला धक्का दिला आहे. त्याला भारत देशही अपवाद नव्हता. काल अर्थव्यवस्थेला चालना देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीचं आर्थिक पॅकेजची घोषणा करताच आज मुंबई शेअर बाजरातही तेजी पहायला आहे. सकाळी 9च्या सुमारास सेन्सेक्स प्री ओपन सेशन दरम्यान सुमारे 1600 अंकांनी वधारलेला पहायला मिळाला तर निफ्टीमध्येही तेजी होती. मुंबई शेअर बाजरात सेन्सेक्स, निफ्टी हिरव्या निशाणावर उघडल्याने गुंतवणूक दारांसाठी हा मोठा दिलासा होता.  काल बाजार बंद झाल्याच्या तुलनेत आज BSE Sensex सकाळी वधारून 32,841.87पर्यंत पोहचलेलापहायला मिळाल. तर NSE Niftyदेखील 9,584.20 पर्यंत पहायला मिळाली.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये Vodafone Idea, ICICI Bank, BHEL हे मॉस्ट अ‍ॅक्टिव्ह स्टॉक पहायला मिळाले. दरम्यान काल रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्यांसह उद्योग जगताला दिलासा देत आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. आता लोकल बद्दल व्होकल होण्याची वेळ आली आहे. यासाठी आर्थिक तरतूद म्हणून भारत सरकारने कोरोना व्हायरसच्या जागतिक महामारीत आर्थिक चक्र वेगाने फिरवण्यासाठी सुमारे 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. थोड्याच वेळात अर्थमंत्रालयाकडून त्यामधील तरतूदींची माहिती दिली जाईल.

आज सेंसेक्स, निफ्टीमध्ये सुमारे 4% वाढ पहायला मिळाली आहे. मागील दोन दिवस सेंसेक्स आणि निफ्टी दोन्हींमध्ये बाजराला मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. आज सुमारे 30 पैकी 27 सेन्सेक्सचे स्टॉक्स हे दिलासादायक स्थितीत पहायला आहेत. तर Nifty IT आणि  Nifty Pharma indices वगळता सारे उत्तम स्थितीत  ट्रेडिंग करत होते.