19 मे दिवशी लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) च्या मतदानाचे सातही टप्पे पार झाल्यानंतर एक्झिट पोल (Exit Poll) हाती आले. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एनडीए ची सत्ता केंद्रात येऊ शकते. असे सांगण्यात आले आहे. त्याचा परिणाम आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून शेअर बाजारावर दिसला. सोमवारी 888 अधिक अंकांनी वर आलेला सेन्सेक्स दुसर्या दिवशी देखील तेजीत पहायला मिळाला आहे. आज (20 मे ) दिवशी सेंसेक्सने सर्वाधिक उसळी घेत 39,554.28 वर उघडला आहे. Exit Poll Results 2019 India: 'एक्झिट पोल'चे अंदाज एनडीएच्या बाजूने; देशात पुन्हा मोदी सरकार
ANI Tweet
#Sensex breaches its previous highest mark of 39487 currently at 39,554.28 pic.twitter.com/xWRCchgbMS
— ANI (@ANI) May 21, 2019
यंदा 11 एप्रिल ते 19 मे 2019 या सात टप्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. दरम्यान 19 मे च्या संध्याकाळी अनेक नामवंत संस्थांचे एक्झिट पोल हाती आले आता 23 मे दिवशी या निवडणूकीचा अंतिम निकाल हाती येणार आहे.