SEC कडून सीरमच्या Covovax COVID-19 vaccine ला Emergency Use Authorisation साठी शिफारस
Covid-19 Vaccine | (Photo Credits: PTI)

भारताच्या Subject Expert Committee (SEC) कडून Serum India of India कडून बनवण्यात आलेल्या COVID-19 vaccine Covovax साठी आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही लस वयवर्ष 12ते 17 वयोगटासाठी आहे. SII कडून कोवोवॅक्स बुस्टर डोस साठी फेज 3 ट्रायल्सचा डाटा देखील सादर करण्यात आला आहे. यापूर्वी DCGI कडून Covovax ला मर्यादित स्वरूपातच परवानगी देण्यात आली होती. 28 डिसेंबर 2021 ला या लसीला परवानगी केवळ प्रौढांसाठी देण्यात आली होती.

CDSCO च्या Subject expert committee कडून नुकतीच बैठक घेण्यात आली होती. यामध्ये कोवोवॅक्सच्या मंजुरीसाठी चर्चा करण्यात आली. अद्याप या लसीच्या अंतिम मंजुरीची प्रतिक्षा आहे. DCGI यावर अंतिम निर्णय घेणार आहे.

कोवोवॅक्स ही 12-17 वयोगटातील मुलांना कोविड 19 विरूद्ध भारतात उपलब्ध करून दिली जाणारी चौथी लस असणार आहे. मात्र अजून ही लस देशाच्या लसीकरण कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून देण्यात आलेली नाही.

Covovax या लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून emergency use साठी लिस्टिंग मिळाले आहे. या लसीचे मॅन्युफॅक्चरिंग Novavax कडून करण्यात आले आहे. दरम्यान युरोपियन मेडिसिन्स एजेंसी कडून या लसीच्या conditional marketing ला परवानगी देण्यात आली आहे.

भारत सरकारने मंजूर केलेल्या पहिल्या कोविड 19 लसींमध्ये सीरमच्याच कोविशिल्ड लसीचा समावेश आहे. ही लस प्रौढांना दोन डोस मध्ये देण्यात आली आहे. भारतात सध्या 15 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. याकरिता सध्या केवळ कोवॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लसीचा वापर केला जात आहे.