COVID-19 Vaccine Update: भारतामध्ये Covovax, Corbevax कोविड 19 लसींना तसेच Molnupiravir या Anti-COVID-19 Pill ला मंजुरी
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

एकीकडे भारतात कोरोनाचा धोका वाढत असताना अधिकाधिक नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी लसींच्या परवानगीने उपचार पद्धती मजबूत करण्याकडे भर दिला जात आहे.  भारतामध्ये आज (28 डिसेंबर)  कोविड 19 लसींमध्ये सीरम इन्स्टिट्युटच्या अजून एका लसीला म्हणजेच Covovax आणि Biological E च्या Corbevax या दोन लसींना काही अटींच्या अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Health Minister Dr Mansukh Mandaviya) यांनी याबाबतची माहिती  ट्वीट करत दिली आहे.

भारतामध्ये CDSCO च्या Subject Expert Committee कडून सोमवारी Molnupiravir या अ‍ॅन्टी कोविड गोळ्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटला देखील मंजुरी देण्यात आली आहे. ज्या प्रौढ रूग्णांचा SpO2 93 आहे. तसेच जोखमीच्या रूग्णांमध्ये ज्यात रूग्णाच्या हॉस्पिटलायझेशनचा धोका, मृत्यूचा धोका आहे अशांना ही औषधं देण्याला मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे.

Covovax ला यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेकडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सीरमने ही लस प्रामुख्याने लहान मुलांसाठी बनवली आहे. सीरमच्या प्रकाश कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, DCGI कडे त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच अर्ज केला होता. दोनदा अर्ज आणि त्यावर विचार विनिमय करून आता सीरमच्या कोवोवॅक्सला मंजुरी मिळाली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

भारतामध्ये कोरोना रूग्ण संख्येमध्ये ओमिक्रॉनची वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. देशात सध्या या पार्श्वभूमीवर पुन्हा नियम कडक करण्यात आले आहेत. दरम्यान 3 जानेवारीपासून भारतात 15-18 वर्षांवरील मुलांचे लसीकरण देखील सुरू होत आहे. सोबतीने प्रिकॉशन डोस देखील देण्यात सरकारने मंजुरी दिली आहे. हे देखील वाचा: COVID Vaccine Registration: येत्या 1 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुले CoWIN App वर कोरोना लसीकरणास पात्र .

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं Pfizer Oral COVID-19 Treatment ला मंजुरी दिली आहे. Paxlovid असं या औषधाचं नाव असून अमेरिकेत 2 वर्षांवरील नागरिकांसाठी हे औषध मंजुर करण्यात आलं आहे. सध्या होम क्वारंटीन असलेल्यांसाठी हे औषध वापरण्यास परवानगी आहे.