अयोद्धा (Ayodhya) नगरी मध्ये रामलल्लांची मूर्ती (Ramlalla Idol) प्राणप्रतिष्ठित करण्याचा सोहळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याची तयारी सुरू असतानाच आता मंदिराच्या ट्र्स्ट कडून रामलल्लांची कर्नाटकामधील Arun Yogiraj यांनी साकारलेली मूर्ती अंतिम झाल्याची घोषणा केली आहे. काल (1 जानेवारी) नववर्षाच्या पहिल्या दिवशीच Union minister Pralhad Joshi यांनी त्याची घोषणा केली आहे. X वर पोस्ट करत त्यांनी अरूण योगीराजच्या मूर्तींची देखील झलक दाखवली आहे. दरम्यान 3 मूर्त्यांमधून अंतिम मूर्तीची निवड करण्यासाठी मंदिर प्रशासनाच्या सदस्यांमध्ये मतदान झाले त्यानंतर ही मूर्ती निवडण्यात आली आहे.
अयोद्धेमध्ये 22 जानेवारी दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मृगशीर्ष नक्षत्राच्या मुहूर्तावर रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. Arun Yogiraj यांच्या मूर्तीची निवड झाल्याचं जाहीर होताच कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री B S Yediyurappa यांनी देखील आनंद व्यक्त करत त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. नक्की वाचा: Consecration Ceremony of Ram Lalla Mandir at Ayodhya Schedule: रामलल्लांच्या स्वागतासाठी अयोद्धा सज्ज; 16 ते 22 जानेवारी दरम्यान पहा कधी, कोणते होणार विधी?
पहा पोस्ट
"ಎಲ್ಲಿ ರಾಮನೋ ಅಲ್ಲಿ ಹನುಮನು"
ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮನ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ವಿಗ್ರಹ ಆಯ್ಕೆ ಅಂತಿಮಗೊಂಡಿದೆ. ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಹೆಸರಾಂತ ಶಿಲ್ಪಿ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಶ್ರೀ @yogiraj_arun ಅವರು ಕೆತ್ತಿರುವ ಶ್ರೀರಾಮನ ವಿಗ್ರಹ ಪುಣ್ಯಭೂಮಿ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗೊಳ್ಳಲಿದೆ. ರಾಮ ಹನುಮರ ಅವಿನಾಭಾವ ಸಂಬಂಧಕ್ಕೆ ಇದು… pic.twitter.com/VQdxAbQw3Q
— Pralhad Joshi (@JoshiPralhad) January 1, 2024
Yogiraj यांच्या आई Saraswathi यांनी देखील आनंद व्यक्त करत आपण प्राणप्रतिष्ठेसाठी जाणार असल्याचं म्हटलं आहे. प्राणप्रतिष्ठा केली जाणारी मूर्ती 51 इंची आहे. यामध्ये रामाचे 5 वर्षाचे रूप दिसणार आहे. दुमजली मंदिराच्या तळघरामध्ये ही रामलल्लांची मूर्ती भाविकांना पाहता येणार आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांकरिता देखील खुले होणार आहे.