SBI ग्राहकांना झटका, FD वरील व्याजदरात कपात
Representational Image (Photo Credits: PTI)

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना झटका दिला आहे. कारण एसबीआयने एफडी वरील व्याजदरात 0.15 टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे ग्राहकांना एफडीवरील मिळणाऱ्या व्याजात घट होणार असून नवे व्याजदर 10 जानेवारी पासून लागू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एसबीआयने त्यांच्या वेबसाईटवर याबबात अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार 1 ते 10 वर्षावरील एफडीवरील व्याजदरात घट केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना नव्या व्याजदरानुसार एफडीवर 6.10 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी एफडीवर ग्राहकांना व्याज 6.25 टक्क्यांनुसार दिले जात होते. तर जेष्ठ नारिकांसाठी हा व्याजदर 6.60 टक्के असणार आहे. मात्र याआधी हा दर 6.75 टक्के होता. बँकेने एफडीवरील व्याजदरात कपात केल्याने ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.

त्याचसोबत एसबीआयने नव्या वर्षात एक नवा नियम आणला आहे. त्यानुसार कोणत्याही ग्राहकाला आपल्या एटीएम (SBI ATM) मधून पैसे काढायचे झाल्यास त्याला वन टाइम पासवर्ड (OTP) टाकणे अनिवार्य असेल. स्टेट बँकेचे डेबिट कार्ड वापरून रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत एटीएममधून पैसे काढल्यास तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येणार आहे. हा ओटीपी एटीएममध्ये टाकल्यानंतरच ग्राहकांना पैसे मिळणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे.

तसेच देशात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. मात्र रिअल इस्टेटमधील परिस्थिती ठीक  एसबीआय यांनी एक नवी योजना सुरु केली आहे. त्यानुसार निर्धारित कालावधीत घराचा ताबा न मिळाल्यास बँक ग्राहकांना त्यांचे होमलोनचे पूर्ण पैसे परत करणार आहे. ही रिफंड योजना ज्यावेळी बिल्डरला ओसी सर्टिफिकेट मिळत नाही तो पर्यंत मान्य असणार आहे