Archived, edited, representative images (Photo Credit: File Photo)

SBI ग्राहकांसाठी खुशखबर असून बँकेने सर्व कर्जाच्या दरात 0.05 टक्के कपात केली आहे. त्याचसोबत मार्गिजनल कॉस्ट बेस्ट इंटरेस्ट (Marginal Coast Based Interest) यासाठीच्या व्याजदरात 0.05 टक्के कपात केली आहे. तर गृहकर्जापासून अन्य कर्जांसाठी व्याजदर कमी करण्यात असल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

तर बँकेने कर्जावर एमसीएलआर मध्ये 8.50 टक्क्यांवरुन 8.45 टक्के केली आहे. त्याचसोबत 10 मे पासून एमसीएलआर सोबत लिंक असलेली सर्व कर्जदर 5 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. बँकेने दुसऱ्यांदा कर्ज दरात कपात केली आहे.(SBI च्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात)

तसेच बँकेने गृहकर्जासह ऑटो लोनसाठी कपात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु आरबीआयकडून रेपो रेट मध्ये कपात केल्यास बँकसुद्धा त्यांच्या कर्ज दरात घट करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र आरबीआयने रेपो रेट वाढवल्यास बँकसुद्धा कर्ज दर वाढवणार आहे.