Representational Image (Photo Credits: PTI)

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने (SBI) त्यांच्या ग्राहकांना पुन्हा झटका दिला आहे. कारण बँकेने काही दिवसांपूर्वी एफडीवरील (FD) व्याजदारत कपात केल्यानंतर आता पुन्हा रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) वरील व्याजदरात घट केली आहे. त्यामुळे आता आरडी धारकांना 0.15 टक्क्यांनी व्याज देण्यात येणार आहे. हे नवे व्याजदर बँकेने लागू केले असून 1 ते 10 वर्षापर्यंतच्या आरडी खात्यावरील व्याजदर 6.25 वरुन 6.10 टक्के करण्यात आले आहेत. यापूर्वी 10 जानेवारीला एसबीआयने 1 वर्ष ते 10 वर्षापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या लॉन्ग टर्म डिपॉझिट्सवर FD दरात 0.15 टक्क्यांनी घट करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता.

रिकरिंग डिपॉझिट एसबीआय मध्ये असल्यास आता ग्राहकांना 1 वर्ष ते 10 वर्षापर्यंत 6.10 टक्क्यांनी व्याज देण्यात येणार आहे. तर एसबीआयच्या आरडी खात्यात प्रत्येक महिन्याला कमीतकमी 100 रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा करणे अनिवार्य आहे. बँकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिस मधील आरडी खात्यात अधिक व्याज देण्यात येते. एसबीआयमध्ये 6.10 टक्क्यांनी व्याज तर पोस्ट ऑफिसात आरडी खात्यावर 7.10 टक्क्यांनी व्याज ग्राहकांना देण्यात येते.

तर 1 ते 10 वर्षावरील एफडीवरील व्याजदरात घट केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना नव्या व्याजदरानुसार एफडीवर 6.10 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी एफडीवर ग्राहकांना व्याज 6.25 टक्क्यांनुसार दिले जात होते. तर जेष्ठ नारिकांसाठी हा व्याजदर 6.60 टक्के असणार आहे. मात्र याआधी हा दर 6.75 टक्के होता. बँकेने एफडीवरील व्याजदरात कपात केल्याने ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.(SBI ची नवी योजना! बिल्डरने वेळेवर घराचा ताबा न दिल्यास बँक परत करणार Home Loan चे पैसे)

त्याचसोबत एसबीआयने नव्या वर्षात एक नवा नियम आणला आहे. त्यानुसार कोणत्याही ग्राहकाला आपल्या एटीएम (SBI ATM) मधून पैसे काढायचे झाल्यास त्याला वन टाइम पासवर्ड (OTP) टाकणे अनिवार्य असेल. स्टेट बँकेचे डेबिट कार्ड वापरून रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत एटीएममधून पैसे काढल्यास तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येणार आहे. हा ओटीपी एटीएममध्ये टाकल्यानंतरच ग्राहकांना पैसे मिळणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे.