Representational Image (Photo Credits: PTI)

देशातील सर्वाधिक मोठी शासकीय बँक स्टेट बँकेकडून ऑनलाईन फसवणूकीला बळी पडू नये म्हणून ग्राहकांना अलर्ट केले आहे. एसबीआयने केवायसी संदर्भात आपल्या 44 कोटी खातेधारकांना अलर्ट करत म्हटले की, SMS च्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या Embed लिंकवर क्लिक करु नये. बँकेने ट्विट करत ग्राहकांना ही माहिती दिली आहे. बँकेने असे म्हटले की, एसएमएसवर दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या खात्यातील रक्कम रिकामी होऊ शकते. एसबीआयच्या नावावर कोणताही मेसेज मिळाल्यानंतर बँकेचा एक शॉर्ट कोड तपासून पहा की तो योग्य आहे की नाही.

बँकेने अलर्ट केला आहे की, त्यांनी आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या एम्बेड लिंकवर एसएमएसच्या माध्यमातून केवायसी करण्यासंदर्भात सांगितले जात नाही. देशात डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये वाढत्या प्रमाणामुळे ऑनलाईन फसवणूकीच्या घटना सुद्धा अधिक वाढल्या आहेत. फसवणूकदार नागरिकांना वेगवेगळ्या मार्गांनी फसवत आहेत. कधी क्यूआर कोड तर कधी लॉटरीच्या माध्यमातून नागरिकांना चुना लावला जात आहे.(7th Pay Commission: खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मिळणार गिफ्ट; महागाई भत्त्यात झाली 11 टक्क्यांची वाढ)

Tweet:

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, उदाहरणार्थ  #YehWrongNumberHai, KYC अशा प्रकारचे एसएमएस हे फसवणूक करु शकतात. त्यामुळे अशा लिंकवर तुम्ही क्लिक करु नका. एम्बेडेड लिंकवर क्लिक करु नका. एसएमएस मिळाल्यानंतर एसबीआयचा योग्य शॉर्ट कोड तपासून पहावा. सतर्क रहा आणि#SafeWithSBI असे त्या ट्विट मध्ये सांगण्यात आले आहे.

यापूर्वी सुद्धा एसबीआयने क्यूआर कोडच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीसंदर्भात अलर्ट जाहीर केला होता. बँकेने असे म्हटले की, तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून क्यूआर कोड दिला जातो तर तो स्कॅन करण्यापासून दूर रहा. कारण असे केल्यास तुमच्या खात्यातील रक्कम लंपास होऊ शकते. बँकेने असे ही म्हटले की, पैसे मिळवण्यासाठ कोणताही क्यूआर कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. त्याचसोबत UPI च्या माध्यमातून सुद्धा पेमेंट करताना सेफ्टी टीप्स जरुर लक्षात ठेवा.