
Saurabh Murder Case: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील (Saurabh Murder Case) आरोपी पत्नी मुस्कान (Muskan) आणि तिचा प्रियकर साहिल यांचा जामीन अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळला. प्राप्त माहितीनुसार, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पवन कुमार शुक्ला यांनी दोघांचा जामीन अर्ज फेटाळला. मुस्कानने प्रियकर साहिलच्या मदतीने पती सौरभ कुमारची हत्या केली होती. दोघांनी सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते निळ्या ड्रममध्ये भरले. त्यानंतर ड्रममध्ये सिमेंट टाकण्यात आले. हत्येनंतर काही दिवसांनीच आरोपींना अटक करण्यात आली.
मुस्कान दीड महिन्याची गर्भवती -
सौरभ हत्याकांड प्रकरणात मृत सौरभची पत्नी मुस्कान आणि साहिल शुक्ला तुरुंगात बंद आहेत. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात नवा ट्विस्ट आला होतो. मेरठ जिल्हा तुरुंगात असलेली मुस्कान रस्तोगी ही दीड महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे त्याची बॅरेक बदलण्यात आली आहे. तुरुंगाच्या नियमावलीनुसार, गर्भवती महिलांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले जाते. मुस्कान आणि आणखी एका महिला कैद्याला एका बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांची काळजी घेतली जात आहे. (हेही वाचा - Meerut Saurabh Murder Case: सौरभ हत्याकांड प्रकरणात मुस्कानला शिक्षेतून सूट मिळेल का? गर्भवती महिलांसाठी काय आहेत नियम? जाणून घ्या)
मुस्कानला तुरुंग नियमावलीनुसार आहार, औषधे इत्यादी दिले जात आहेत. या दोन महिला कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. मेरठमध्ये पत्नी मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून पती सौरभची हत्या केली होती. ही हत्या अत्यंत क्रूरते पद्धतीने करण्यात आली होती. त्यानंतर, सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. ते ड्रममध्ये ठेवण्यात आले आणि हा ड्रम सिमेंटने सील करण्यात आला. (हेही वाचा - Bengaluru Murder Case: बेंगळुरूमध्ये भयानक हत्याकांड! पुण्यातील सॉफ्टवेअर व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये लपवला; आरोपीला अटक)
एवढेच नाही तर खून केल्यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचलला फिरण्यासाठी गेले. त्यांनी तेथे 11 दिवस घालवाले. परंतु, जेव्हा ते परतले तेव्हा हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मुस्कान आणि साहिल 19 मार्चपासून मेरठ जिल्हा तुरुंगात आहेत.