Image credit: Pixabay

पूर्ण देशभारत लोक उन्हाच्या वाढत्या तापमाना मुले खूप हैराण झाले होते.देशभरात सर्वच पाऊस येण्याची खूप आतुरतेने वाट पाहत होते. अगदी लहानान पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना पाऊस येण्याची आतुरता होती. परंतु आता देशभरातल्या काही राज्यात दमदार मान्सूनपूर्व पाऊस बरसला आह.सध्या मुंबई,पुणे व केरळ सारख्या शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी ह्या अवकाळी पावसाने  खूप नुकसान केल्याचे समोर आले आहेत,आज 5 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या विभागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. पण अद्याप  साताऱ्यात पावसाने हजेरी लावली नाही आहे.पण आज साताऱ्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जाहीर केला आहे विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता सांगितली जात आहे. उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने सातारा  शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: मान्सून पूर्व पाऊस बरसण्यापूर्वी वातावरण ढगाळ, राज्यात अनेक ठिकाणी दमदार सरी; जाणून घ्या हवामान अंदाज

सातारा शहराचा उद्याचा हवामान अंदाज काय असेल पहा:

हवामान विभागाच्या अंदाजानुसार,  यंदा महाराष्ट्रामध्ये 5-6 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस राज्यात यंदा दमदार बरसेल असा अंदाज आहे. पावसावर शेतीची कामं अवलंबून असल्याने सध्या शेतकर्‍यांना देखील त्याची प्रतिक्षा आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडल्याने पाणी टंचाई ची समस्या निर्माण झाली आहे सोबतच अनेक ठिकाणी फळबागा देखील पाण्या अभावी  करपून  गेल्याने शेतकर्‍यांना आता वरूण राजावरच अवलंबून रहावं लागत आहे.