Coronavirus: सातारा (Satara) जिल्ह्यात आज 19 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच वडगाव येथील 75 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी माहिती दिली आहे.
आज सापडलेल्या 19 रुग्णांमध्ये 11 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील वडगांव येथील 75 वर्षीय बाधित पुरुषाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील होळ मध्ये 7, तर तांबवे येथी 6 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कराड तालुक्यातील तुळसण येथे 5, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. (हेही वाचा - औरंगाबाद मध्ये 90 नव्या Coronavirus रुग्णांसह जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1936 वर)
सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 619 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी साताऱ्यातील वडगाव उंब्रज येथील दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर 9 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. तसेच काल जिल्ह्यातील 6 जण कोरोना मुक्त झाले.
#सातारा जिल्ह्यात १९ नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वडगांव येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.#CoronaUpdates
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) June 6, 2020
दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रात 139 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 2436 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 80,229 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 2849 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 35,156 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.