New BJP President Of Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका (Jammu and Kashmir Assembly Elections 2024) संपताच भाजप (BJP)ने संघटनेत नव्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत. भाजपने सत शर्मा (Sat Sharma) यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी (BJP State President) नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पक्षाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी सत शर्मा यांची भारतीय जनता पार्टी जम्मू-काश्मीरच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच रविंदर रैना यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी सत शर्मा यांची राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
तथापी, सत शर्मा यांनी याआधी जम्मू-काश्मीरच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. रविंदर रैना (जे 2018 पासून अध्यक्ष होते) यांचा कार्यकाळ खूप पूर्वी संपला असून भाजप संघटनात्मक निवडणुकांच्या तयारीत आहे. त्यामुळे नेतृत्व बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. येत्या काही दिवसांत आणि आठवड्यात पक्षाला अनेक राज्यांत नवे प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Death Threat To Yogi Adityanath: '10 दिवसांत राजीनामा न दिल्यास बाबा सिद्दीकीसारखे हाल होतील'; योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी)
सत शर्मा 2014 ते 2018 पर्यंत जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सत शर्मा यांनी जम्मू पश्चिम विधानसभेतून निवडणूक जिंकली होती. शर्मा हे तत्कालीन भाजप-पीडीपी सरकारमध्ये ते 40 दिवस गृहनिर्माण आणि विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. त्यांचा जन्म जम्मूतील डोगरा ब्राह्मण कुटुंबात झाला.
Sat Sharma appointed as the BJP president of Jammu and Kashmir.
Ravinder Raina has been appointed as the National Executive Member of the party: BJP pic.twitter.com/D3ZcoDelL4
— ANI (@ANI) November 3, 2024
दरम्यान, भाजप आज विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणार आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची महत्त्वाची जबाबदारी विधीमंडळ पक्षाचे नेते सांभाळणार आहेत. मंत्री प्रल्हाद जोशी आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी नियुक्त केलेल्या केंद्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली श्रीनगरमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची निवडणूक होणार आहे.