Randeep Hooda | Twitter

सरबजित सिंग (Sarabjit Singh) यांची बहीण दलबीर कौर (Dalbir Kaur) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) याने दलबीर कौर यांच्यावर अंतिम संस्कार केले आहेत. दरम्यान सरबजित सिंगला पाकिस्तान मध्ये कोर्टात दहशतवाद आणि हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेवर आधारित बॉलिवूड सिनेमामध्ये रणदीपने सरबजितची भूमिका साकारली आहे तर त्याच्या बहिणीची भूमिका ऐश्वर्या राय बच्चनने साकारली आहे.

2016 मध्ये प्रदर्शित या जीवनपटादरम्यान दलबीर यांची रणदीप सोबत भेट झाली होती. त्यांचा बॉन्ड सिनेमाच्या कामादरम्यान इतका खास झाला की दलबीर यांना रणदीप मध्ये भाऊ सरबजित दिसत होता. त्यावेळी त्यांनी रणदीप कडे आपल्या अंत्यविधी दरम्यान 'खांदा' देण्याची इच्छा बोलून दाखवली. दलबीरच्या निधनाचं वृत्त समजताच रणदीपही तातडीने त्यांच्या गावी गेला. दलबीर यांचा मृत्यू 26 जूनला पंजाबच्या अमृतसर मधील Bhikhiwind गावात हृद्यविकाराचा झटक्याने झाला.

हे देखील नक्की वाचा: Swatantra Veer Savarkar: महेश मांजरेकर यांच्या "Swatantra Veer Savarkar" या बायोपिकमध्ये रणदीप हुड्डा साकारणार विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका .

सरबजित वरील चित्रपट Omung Kumar यांनी दिग्दर्शित केला होता. बॉक्स ऑफिसरवर या सिनेमाने मोठा गल्ला जमावला आहे. सरबजितचा लाहोरच्या तुरूंगात मृत्यू झाल्यानंतर 3 वर्षांनी रिलीज झाला आहे.