केरळ (Kerala) स्थित शबरीमला मंदिरात (Sabarimala Temple) आज सकाळी दोन महिलांनी प्रवेश करुन देव दर्शन घेतले. त्यानंतर शुद्धीकरणासाठी मंदीर बंद ठेवण्यात आले होते. आता शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
आज सकाळी बिंदु (Bindu) आणि कनकदुर्गा (Kanakdurga) या दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करुन शेकडो वर्षांची परंपरा मोडली. त्यामुळे मंदीर शुद्धीकरणासाठी बंद ठेवण्यात आले होते.
Kerala's #SabarimalaTemple shut for purification rituals. Two women devotees in their 40's had entered the temple in the early morning hours today. pic.twitter.com/jMefTpCsCE
— ANI (@ANI) January 2, 2019
मंदिरात जावून दर्शन घेण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशासाठी मान्यता दिली असली तरी न्यायालयाच्या या निर्णयाला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे अद्याप महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.