रुपया 74.47 या नव्या निच्चांकावर, 5 मिनिटात गुंतवणूकदारांचे सुमारे 4 लाख कोटींचे नुकसान
रूपया अवमूल्यन photo credits File photo

मागील काही महिन्यांपासून डॉलरसमोर रूपयावरील वाढता दबाव आता अजूनच वाढत चालला आहे. आज बाजार उघडताच सेंसेक्स आणि निफ्टी या दोघांच्याही निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. याचा परिणाम रूपयावरही झाल्याने रुपयाने पुन्हा नवा निच्चांक गाठला आहे.

आज बाजार उघडताच सेन्सेक्स ३३,७७४.८९ आणि निफ्टी 300 अंकांनी खाली गेल्याने गुंतवणूकदरांना फटका बसत आहे. आज रूपया अमेरिकन डॉलरसमोर 74.47  इतका झाला आहे.शेअर बाजार उघडताच अवघ्या 5 मिनिटात गुंतवणूकदारांचे सुमारे 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. रूपयामध्येही 9 पैशांनी घसरण झाली आहे. बाजार उघडताच रूपया 74.30 होता. रूपयामध्ये सतत्याने होणारी घसरण चिंतेचा विषय आहे.  ... म्हणून अमेरिकन डॉलरसमोर रूपयाची सतत होतेय घसरण

बुधवारी शेअर बाजारात सेंसेक्सने 461 अंकांची मुसंडी मारून वधारला होता. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा रूपयाची घसरण झाल्याने निच्चांकी मूल्यावर तो पोहचला आहे.