मंगळवारी, 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुसरा रोजगार मेळावा (Rozgar Mela) आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी केंद्र सरकार एकाच वेळी 71,000 युवकांना कन्फर्म नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उमेदवारांना नियुक्ती पत्र देणार आहेत. याआधी पंतप्रधान मोदींनी दिवाळीच्या दिवशी रोजगार मेळाव्याअंतर्गत सुमारे 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली होती. विविध मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदे दीड वर्षात मिशन मोडमध्ये भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभागांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले होते. दिवाळीनिमित्त आयोजित रोजगार मेळाव्यात देशभरातून निवडक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये गट-अ, गट-ब (राजपत्रित), गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क नियुक्ती तसेच केंद्रीय सशस्त्र दल, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, कनिष्ठ लिपिक (एलडीसी), लघुलेखक, पीए, आयकर निरीक्षक, टॅक्स इन्स्पेक्टर, रेल्वे एमटीएस यासारख्या पोस्टचा समावेश होता.
केंद्र सरकारचे अनेक मंत्रीही या रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते. हे मंत्री विविध प्रांतांमध्ये पंतप्रधानांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगशी संबंधित होते. त्यांनी आजूबाजूच्या तरुणांना नियुक्तीपत्रे दिली होती. ओडिशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, चंदिगडचे अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे पियुष गोयल आणि गुजरातचे मनसुख मांडविया यांनी रोजगार मेळाव्याला हजेरी लावली. याशिवाय ज्या तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात येणार होते, त्यामध्ये अन्य केंद्रीय मंत्री आणि खासदारही आपापल्या भागातील उपस्थित होते.
यावेळीही असाच कार्यक्रम करण्यात आला आहे. पीएम मोदी मंगळवारी सकाळी 10 वाजता रोजगार मेळा-2 सुरू करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात रायपूर, नवी दिल्ली, पणजी, गुरुग्राम, पोर्ट ब्लेअर, विशाखापट्टणम, इटानगर, गुवाहाटी, पाटणा, श्रीनगर, उधमपूर, जम्मू, रांची, हजारीबाग, बंगळुरू, तिरुवनंतपुरम, लेह, भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, पुणे, नागपूर, इम्फाळ, शिलाँग, आयझॉल, दिमापूर, भुवनेश्वर आणि जालंधर इत्यादी 45 शहरांचा समावेश आहे. (हेही वाचा: Fact Check: मोदी सरकार आधार कार्डवर देत आहे 478000 रुपयांचे कर्ज? काय आहे व्हायरल बातमीचे सत्य? जाणून घ्या)
तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्र देण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 22 नोव्हेंबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्याच्या दुसऱ्या टप्प्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन चेन्नई येथून, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपुरातून, माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर गुरुग्राम, पंचायत राज मंत्री गिरिराज सिंह पाटणा, अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे प्रयागराज येथून आणि PMO मधील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह दिल्लीतील छावला येथील BSF शिबिरातून रोजगार मेळाव्यात सामील होतील.