River in Thar Desert: संशोधकांनी तब्बल 172 वर्षांपूर्वी थार वाळवंटात वाहणाऱ्या नदीचा शोध लावला; या क्षेत्रात नद्यांचे दाट जाळे वाहत असल्याचा दावा 
थार वाळवंट (संग्रहित संपादित प्रतिमा)

राजस्थानमधील बीकानेर (Bikaner) जवळील थारच्या वाळवंटात (Thar Desert) वाहणारी 172 हजार वर्ष जुनी नदी संशोधकांनी शोधून काढली आहे. असे मानले जात आहे की, लोकांचा तिथे वास राहावा यासाठी ही नदी आजूबाजूच्या परिसरातील मानवी लोकसंख्येसाठी जीवनवाहिनी ठरली असावी. क्वाटरनरी सायन्स रिव्युज नावाच्या मासिकात हे तथ्य प्रकाशित झाले आहेत. यामध्ये थार वाळवंटातील नल गावाजवळील नदीविषयी माहिती दिली आहे. अभ्यासामध्ये सापडलेल्या पुराव्यांवरून असे दिसून येते की सुमारे 172 हजार वर्षांपूर्वी राजस्थानच्या बीकानेर येथे जवळपासच्या आधुनिक नदीपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर एक नदी वाहत होती.

जर्मनीमधील The Max Plank Institure for the science of human history, तामिळनाडूमधील अण्णा विद्यापीठ आणि कोलकाताच्या आयआयएसईआर संस्थांच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, अश्म युगात त्या भागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या होती जो परिसर आता थार वाळवंट बनला आहे. या निष्कर्षांद्वारे थार वाळवंटातील आधुनिक नदी व वाळलेल्या घग्गर-हकरा नदीच्या वाटेसंबंधी पुरावे उपलब्ध असल्याचे संशोधकांनी सांगितले. ते म्हणाले की, मध्य थर वाळवंटात वाहणारी नदी त्या काळातल्या लोकसंख्येसाठी जीवनरेखा असावी.

थार वाळवंटातील पूर्वीच्या रहिवाशांसाठी 'वाळलेल्या' नद्यांचे संभाव्य महत्त्व दुर्लक्ष केले गेले आहे असे संशोधकांनी अधोरेखित केले. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे झिम्बाब ब्लिंकहॉर्न म्हणाले की, थारच्या वाळवंटात समृद्ध प्रागैतिहासिक कालखंड आहे आणि अश्म युगात लोक कसे राहतात आणि त्यांची वस्ती कशी विकसित करत असावेत याचा आम्ही विस्तृत पुरावा सादर करीत आहोत.

ते म्हणाले, ‘आम्हाला माहित आहे की या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी नद्या किती महत्त्वपूर्ण असू शकतात, परंतु प्रागहाससारख्या प्रमुख काळात नद्यांच्या व्यवस्थेबद्दल आपल्याकडे फारच कमी माहिती आहे.’ संशोधकांच्या म्हणण्यानुसार, उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासानुसार हे दिसून आले की थार वाळवंटात नद्यांचे दाट जाळे वाहत आहे.