Reliance Industries Market Cap: मुकेश अंबानी यांच्या 'रिलायन्स' चा नवा विक्रम; बनली 200 अब्ज डॉलर्स मार्केट कॅपवाली पहिली भारतीय कंपनी
Mukesh Ambani (Photo Credits: IANS)

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स (Reliance Industries), ही 200 अब्ज डॉलर्सचा मार्केट कॅप (Market Cap) प्राप्त करणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे. गुरुवारी शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाल्यानंतर कंपनी या टप्प्यावर पोहोचू शकली. बीएसई वर कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढून 2,343.90 च्या विक्रमी पातळीवर गेले. यासह कंपनीचे बाजार भांडवल 14,14,764.90 कोटी रुपये म्हणजेच 192.85 अब्ज डॉलर्सवर पोहोचले. तसेच, कंपनीचे अर्धवट पैसे भरले गेलेले शेअर्स जवळपास 8 टक्क्यांनी वाढून, 1,365 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेले. त्यांचा मार्केट कॅप 57,815.36 कोटी रुपये, म्हणजेच 7.82 अब्ज इतका आहे. अशाप्रकारे एकूणच कंपनीचे बाजार मूल्य 200.68 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले.

रिलायन्स रिटेल रिटेल व्हेंचरमध्ये अमेरिकेतील सिल्व्हर लेक (Silver Lake) पार्टनर्सने बुधवारी 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली. या घोषणेनंतर,  रिलायन्सचे शेअर्स वधारले ते विक्रमी उच्चांकावर पोहोचले. रिलायन्स जिओ नंतर आता सिल्व्हर लेक रिलायन्स रिटेलमध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी करणार आहे. खासगी इक्विटी कंपनी 7500 कोटी रुपयांमध्ये 1.75 टक्के भागभांडवल खरेदी करेल. यापूर्वी अमेरिकन इक्विटी कंपनी सिल्व्हर लेकनेही जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 2.08 टक्के भागभांडवल खरेदी केले.

दरम्यान, मुकेश अंबानी दीर्घ काळापासून किरकोळ व्यवसायासाठी गुंतवणूकदार शोधत होते. आता त्यांना सिल्व्हर लेक कंपनीद्वारे पहिला गुंतवणूकदार मिळाला आहे. रिलायन्स रिटेलच्या 1.75 टक्के भागभांडवलासाठी सिल्व्हर लेक 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. सिल्व्हर लेकने रिलायन्सची टेक कंपनी जिओ प्लॅटफॉर्मवरमध्येही गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने गेल्या महिन्यात फ्यूचर ग्रुपचा रिटेल व्यवसाय मिळविला. रिलायन्स रिटेल लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठा आणि वेगवान वाढणारा किरकोळ व्यवसाय चालविते, देशभरात त्यांचे सुमारे 12,000 स्टोअर्स आहेत.

(हेही वाचा: रिलायन्स जिओ या वर्षांच्या अखेरीस स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन बाजारात घेऊन येण्याची शक्यता; Xiaomi, Realme, Oppo, Vivo सारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान)

एक टेलिकॉम कंपनी म्हणून मोठ्या कंपन्यांना मागे सोडल्यानंतर, आता रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजेच जिओने (Jio) स्मार्टफोन तयार करणार्‍या कंपन्यांना आव्हान देण्याची योजना आखली आहे. होय, ताज्या अहवालानुसार रिलायन्स जिओ या वर्षाच्या अखेरीस 100 दशलक्ष स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन  (Android Phone) बाजारात आणू शकेल.