
लवकरच तुमच्या शिखात 100 रुपयांची नोट दिसून येणार आहे. कारण 100 रुपयांच्या या नव्या नोटेबद्दल असे बोलले जात आहे की, ना ती फाटणार आहे ना पाण्यात भिजली तरीही ओली होणार आहे. खरंतर रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) 100 रुपयांची वॉर्निश लावण्यात आलेली नोट आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयकडून अशा प्रकारच्या 1 अरब नोट छापणार आहे. वार्निश लावण्यात आलेल्या नोटा उतरण्यामागील कारण म्हणजे त्या अधिक टिकाऊ आणि सुरक्षित राहतील. सध्या त्या ट्रायलच्या आधारावर जारी केल्या जाणार आहेत. फिल्ड ट्रायल यशस्वी झाल्यानंतर वार्निश लावण्यात आलेल्या नोटा बाजारात उतरवल्या जाणार आहेत. तसेच जुन्या नोट्या हळूहळू बंद केल्या जाणार आहेत. आरबीआयने ही माहिती त्यांच्या वार्षिक रिपोर्ट्समध्ये दिली आहे.
सध्या बाजारात 100 रुपयांची नोट ही जांभळ्या रंगाची आहे. आरबीआय आता वॉर्निश लावण्यात आलेले 100 रुपयांनी नोट जारी करणार आहे. ही नोट सुद्धा जांभळ्याच रंगाची असणार आहे. आता नव्या 100 रुपयांच्या नोटीच खासियत अशी असणार आहे की, ती खराब होणार नाही आहे. हजार वेळा जरी ती फोल्ड केल्यास ती फाटली जाणार नाही आहे. 100 रुपयांच्या नोटेवर पाण्याचा सुद्धा काही परिणाम होणार नाही आहे. कारण या नोटांवर वार्निश पेंट लावण्यात येणार आहे. वार्निश पेंट म्हणजेच त्याचा वापर लाकडावर केला जातो. सध्याच्या नोटा लवकरच खराब होतात आणि फाटतात सुद्धा.(HDFC Bank ग्राहकांसाठी सूचना; फसवणूक टाळण्यासाठी ॲप डाऊनलोड करताना घ्या 'अशी' काळजी)
100 रुपयांच्या नोटेचे डिझाइन बदलले जाणार नाही आहे. तर त्यावर गांधीजींचीच सीरिज कायम राहणार आहे. फक्त ती अधिक टिकाऊ असणार आहे. 100 रुपयांची सध्याची नोट दीड ते दोन वर्ष सहज टिकू शकते पण वार्निशिंग केलेली नोट 7 वर्षापर्यंत तशीच राहू शकणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून वॉर्निश असलेल्या 100 रुपयांची नोट छापण्यास परवानगी दिली गेली आहे.गेल्या वर्षात अर्थिक राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी एका प्रश्नाचे उत्तर देत म्हटले की, राज्यसभेत या बद्दल सांगण्यात आले होते. तसेच सरकराने एक अरब वार्निश नोट छापण्यासाठी मंजूरी दिली असून त्या दीर्घकाळ टिकणार आहेत.