Air India | (Photo Credits: Instagram)

एअर इंडिया (Air India) ही भारत सरकारची विमान कंपनी आता पूर्णपणे टाटा समूहाच्या (Tata Group) मालकिची झाली. जवळपास 69 वर्षांनी ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समुहाकडे आली. या कंपनीचे पूर्ण हस्तांतरण नुकतेच पार पडले. एअर इंडियाची सर्व सूत्रे टाटा समूहाकडे आल्यानंतर समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी प्रवाशांना खास स्वागत संदेश पावला आहे. आर्थिक डबघाईला आलेल्या कंपनीची मालकी घेतल्यानंतर या कंपनीला पुन्हा चांगले दिवस आणण्याचा विश्वास व्यक्त करत टाटांनी सर्व प्रवाशांचे स्वागत केले आहे.

टाटा समूहाच्या मालकिच्या एअर इंडियाच्या विमानाने घेतलेल्या पहिल्या उड्डानादरम्यान, रतन टाटा यांनी दिलेल्या ध्वनिमुद्रीत संदेशात त्यांनी म्हटले की, 'टाटा समूह एअर इंडियाच्या नव्या ग्राहकांचे स्वागत करत आहे. सर्व प्रवाशी सुविधा आणि इतर सेवांमध्ये एअर इंडिया (Air India) एक अग्रगण्य विमान कंपनी बनविण्यासाठी आम्ही उत्साहीत आहोत.' रतन टाटा यांचा हा संदेश सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा, Tata Group ला अधिकृतपणे 68 वर्षानंतर मिळाले Air India चे अधिकार)

इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Air India (@airindia.in)

एअर इंडियाने ध्वनिमुद्रीत केलेला संदेश शेअर करत इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर लिहिण्यात आले की, 'श्री रतन टाटा, चेअरमन एमेरिट्स, टाटा संन्स, चेअरमन टाटा ट्रस्ट द्वारा एअर इंडियाचे उड्डाणात सर्व प्रवाशांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.' हा संदेश आपण खाली ऐकू शकता.

ट्विट

दरम्यान, केंद्र सरकारच्या ताब्यात गेल्यानंतर जवळपास 69 वर्षांनी एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाकडे परतली आहे. रतन टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाईन्सची स्थापना केली. 1946 मध्ये तिचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले. सरकारने 1953 मध्ये एअरलाईनचे नियंत्रण आपल्याकडे घेतले. मात्र, असे असले तरी जेआरडी टाटा हे 1977 पर्यंत या कंपनीचे अध्यक्ष राहिले.