Rashid Khan Health Update: दिग्गज शास्त्रीय गायक रशिद खान  Ventilator Support वर; प्रकृती चिंताजनक
Rashid Khan | Instagram

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायकांपैकी एक उस्ताद रशिद खान (Rashid Khan) यांची प्रकृती चिंताजनक आहे. रशिद खान यांच्यावर प्रोस्टेट कॅन्सरचे (Prostate Cancer) उपचार सुरू आहेत. 55 वर्षीय खान यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्ट (Ventilator Support) वर ठेवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. कोलकत्ता मध्ये त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांच्याअवर सुरूवातीच्या टप्प्यात टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते मात्र नंतर त्यांनी कोलकत्ता मध्येच उपचार घेणं पसंत केले.

हॉस्पिटल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सुरूवातीला ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र cerebral attack नंतर त्यांची प्रकृती ढासळली. आता त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. नक्की वाचा: Veteran Singer Anup Ghoshal Passes Away: ज्येष्ठ गायक-संगीतकार अनुप घोषाल यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन .

पहा ट्वीट

उस्ताद रशिद खान हे रामपुर-सहसवान घराण्याचे गायक आहेत. ज्याचा उगम मेहबूब खान आणि त्यांचा मुलगा इनायत हुसैन खान यांच्यापासून झाला. जरी प्रामुख्याने शास्त्रीय गायक असले तरी, राशिद खान यांना फ्यूजन आणि चित्रपटातील गाण्यांना देखील भरपूर प्रशंसा मिळाली. रशीद यांनी अनेक बंगाली गाणी गायली आहेत. सोबतच बॉलिवूड मध्ये 'तोरे बिना मोहे चैन नहीं' आणि 'आओगे जब तू' या लोकप्रिय गाण्यांना स्वरसाज चढवला. या गायकाने 'माय नेम इज खान', 'राझ 3', 'बापी बारी जा', 'कादंबरी', 'शादी में जरूर आना', 'मंटो' आणि 'मीतिन मास' यांसारख्या हिंदी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत.