प्रख्यात गायक, संगीतकार अनुप घोषाल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी अनुप यांनी या जगाचा निरोप घेतला. अनुप घोषाल दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत होते. ‘मासूम' चित्रपटामधील 'तुझसे नाराज नही जिंदगी' सारखे सुपरहिट गाणे देणारे अनुप घोषाल यांच्या निधनामुळे सिनेजगतात शोककळा पसरली आहे. 1981 मध्ये 'हीरक राजार देशे'साठी पार्श्वगायक म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी सत्यजित रे यांना त्यांच्या बंगाली चित्रपटांमध्ये सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून सहाय्य केले होते. अनुप घोषाल हे 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून उत्तरपारा मतदारसंघातून (हुगली 185) पश्चिम बंगाल विधानसभेच्या सदस्यांपैकी एक म्हणून निवडून आले होते. (हेही वाचा: Shreyas Talpade Health Update: हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने दिले अभिनेत्याच्या प्रकृतीसंदर्भात 'हे' अपडेट)
#AnupGhoshal, Veteran Singer-Composer, Dies at 78 #AnupGhoshal #AnupGhoshalDeath #AnupGhoshalDemise #EntertainmentNews https://t.co/xrSnXx1qme
— LatestLY (@latestly) December 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)