आज Election Commissioner of India म्हणून आयएएअस अधिकारी राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी पदभार स्वीकारला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासोबतच निवडनूक आयुक्त सुशील चंद्रा सोबत आता राजीव कुमार निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहतील. दरम्यान अशोक लवासा यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आता राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे झारखंड कॅडरचे IAS officer आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांची फायनांस सेक्रेटरी पदावरून निवृत्ती झाली होती. त्यानंतर सरकारकडून त्यांच्यावर Public Enterprises Selection Board ची जबाबदारी दिली आहे.
ANI Tweet
Rajeev Kumar assumes charge as the new Election Commissioner of India. He joins the Election Commission of India with Chief Election Commissioner Sunil Arora and Election Commissioner Sushil Chandra. pic.twitter.com/86urw3YH87
— ANI (@ANI) September 1, 2020
राजीव कुमार यांची नियुक्ती पुढील 5 वर्षांसाठी असेल. म्हणजे 2025 पर्यंत ते कार्यरत असतील म्हणजेच पुढील लोकसभा निवडणूका 2024 झाली होणार आहेत तेव्हा ते कार्यरत असतील. दरम्यान त्यांचा सहभाग पंतप्रधान कार्यालयाकडून आर्थिक धोरणांची बांधणी करण्याच्या कामामध्ये आहे.
अशोक लवासा यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा देत एशियन डेव्हल्पमेंट बॅंक च्या व्हाईस प्रेसिडंट पदाची जबाबदारी स्वीकरली आहे. दरम्यान त्यांचे मोदी सरकार सोबत संबंध ताणले गेले होते अशी देखील चर्चा आहे.