प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

Rajasthan: राजस्थान मधील धौलपुर गावात एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 28 वर्षाचा नारायण मीणा गेल्या 10 वर्षांपासून नोकरीची अपेक्षा करत होता. याच आठवड्यात त्याने भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये त्याने त्याला नोकरी न मिळण्यामागे गेल्या भाजप सरकाच्या नावाचा उल्लेख केला आहे.(Crime: मध्य प्रदेशात दलित कुटूंबातील वर लग्नात घोड्यावर स्वार झाल्याने गावातील गटाकडून मारहाण, 9 जण अटकेत)

इंडियन एक्सप्रेसने मृत तरुणाच्या परिवाराच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, भाजप सरकारने आयुर्वेद कंपाउंडर भर्तीची घोषणा केली होती. परंतु त्यासाठी कोणालाही घेण्यात आले नाही. मीणा राज्यातील अनूसुचित जाती समुदायातील होता. मीणा याने सुसाइड नोट मध्ये असे लिहिले आहे की, मुख्यमंत्री गहलोत यांनी त्याचे आई-वडिल आणि मावशीची आर्थिक मदत करण्याचे आपील केले. त्या सरकारची पाच वर्ष अशीच निघून गेली. मी 2012 पासून वाट पाहत होतो आणि माझ्या परिवाराचा पैसा फुकट घालवला.(Crime: सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप शेअर केल्याप्रकरणी एका युवकाला टोळक्यांची मारहाण, गुन्हा दाखल)

मीणा याच्या वडिलांनी असे म्हटले ही, तो नव्या कंपाउंडर भर्तीच्या परिक्षेसाठी बसला होता. परंतु गेल्या वर्षाच्या अखेरीस निकाल आला तेव्हा त्याची निवड झाली नाही. त्यामुळे तो अधिक तणावाखाली गेला. त्यानंतर त्याने 25-26 च्या मध्यरात्री आत्महत्या केली. आम्हाला याबद्दल 26 जानेवारीला सकाळी कळले. त्यानंतर शव घेण्यासाठी धौलपुर शहरात गेलो आणि तेथे एक सुसाइड नोट सुद्धा मिळाली.