![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/2019-08-20-1-2-781x441-380x214.jpg)
राजस्थान (Rajsthan) विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी पोलीस आणि तुरुंगाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान अशोक गेहलोत सरकारमधील मंत्र्यांनी एक वादग्रस्त विधान केले. मंत्री शांती धारिवाल (SK Dhariwal) यांनी राजस्थान राज्य बलात्काराच्या (Rape) बाबतील देशात पहिल्या स्थानावर असल्याचे सांगितले. याबाबतचे कारण नमूद करताना, ते म्हणाले की, राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याने इथे जास्त बलात्कार होत आहेत. असे म्हणत धारीवाल चक्क हसले आणि त्यांच्यासोबत अनेक मंत्री आणि काँग्रेसचे नेतेही हसू लागले.
रिपोर्टनुसार, धारीवाल यांनी जेव्हा हे वक्तव्य दिले, त्यावेळी विधानसभेत भाजपचा एकही आमदार नव्हता. धारिवाल यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात करताच त्यांच्या भाषणावर संतप्त होऊन विरोधी पक्षाचे आमदार सदनाबाहेर पडले होते. धारिवाल जेव्हा बलात्काराबाबत वादग्रस्त वक्तव्य देत होते तेव्हा विधानसभेचे थेट प्रक्षेपण त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून केले जात होते. नंतर YouTube चॅनेल आणि असेंबली रेकॉर्डमधून हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला.
I've always respected women & encouraged them to participate in everything. It was a slip of tongue, I wanted to say "iss pradesh mein ye marz kahan se aa gaya" but ended up saying "ye mardon ka pradesh hai". I'll apologise in the House: Rajasthan Min SK Dhariwal on 'rape remark' pic.twitter.com/KJWbRFtZIR
— ANI (@ANI) March 10, 2022
यावर राजस्थान भाजपचे प्रमुख डॉ. सतीश पुनिया म्हणाले की, ‘राज्य बलात्काराबाबत पहिल्या क्रमांकावर असल्याची निर्लज्जपणे कबुली देणे आणि पुरुषांच्या आडून महिलांबाबत केलेले वक्तव्य हे राज्यातील महिलांचा अवमान करणारे आहेत. याशिवाय पुरुषांचाही अपमान करणारे आहे. प्रियांका गांधी आता यावर काय बोलणार? काय करणार?` (हेही वाचा: Crime: विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पती अटकेत)
या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यावर धारिवाल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ‘मी नेहमीच महिलांचा आदर केला आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. विधानसभेमध्ये बोलताना माझी जीभ घसरली. मला, ‘इस प्रदेश में ये मरज़ कहां से आ गया’ असे म्हणायचे होते, परंतु चुकून ‘ये मर्दों का प्रदेश है’, असे तोंडातून बाहेर पडले. मी सभागृहाची माफी मागतो.